NIA raids : गँगस्टर-दहशतवादी संबंधाबाबत NIA चे देशभरात ५१ ठिकाणी छापे | पुढारी

NIA raids : गँगस्टर-दहशतवादी संबंधाबाबत NIA चे देशभरात ५१ ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. आज एनआयएने दहशतवादी-गँगस्टर तस्करांच्या संबंधाशी संबंधित तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ६ राज्यांत ५१ ठिकाणी छापे टाकले. दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये हे छापे टाकले.

दहशतवादी आणि ड्रग्ज विक्रेते यांच्यातील संबंध संपवण्याच्या उद्देशाने एनआयएने हे पाऊल उचलले आहे. भारतातील दहशतवादी सूत्रधार हवाला चॅनलद्वारे परदेशात राहणाऱ्या दहशतवाद्यांना आणि गुंडांना शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवतात.

पंजाब, हरियाणा, राजस्थानसह ५० ठिकाणी छापे

एनआयएने पंजाबमधील ३० ठिकाणी छापे टाकले आहेत. तर राजस्थानमध्ये १३, हरियाणामध्ये ४, उत्तराखंडमध्ये २, दिल्ली-एनसीआर आणि यूपीमध्ये प्रत्येकी १ ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने केलेल्या अनेक गुंडांच्या चौकशीदरम्यान ते परदेशातून टेटर फंडिंग, शस्त्रास्त्र पुरवठा आणि देशविरोधी कारवाया करण्यासाठी नेक्ससचा वापर करत असल्याचेही समोर आले आहे.

राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये छापेमारी सुरूच

एनआयएचे पथक सध्या राजस्थानमधील गंगासागर जिल्ह्यातील सूरतगड आणि राजियासर येथे छापे टाकत आहे. सुरतगडमधील एका विद्यार्थी नेत्याच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. यापूर्वी २१ सप्टेंबर रोजी एनआयने फरारी गोल्डी ब्रारशी संबंधित पंजाब आणि हरियाणातील १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले होते. एनआयएच्या यादीत गोल्डी ब्रार हे नाव असलेल्या गुंडांपैकी एक आहे. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील तख्तुपुरा गावात बुधवारी एनआयएने एका दारू ठेकेदाराच्या घरावर छापा टाकला. याशिवाय एजन्सीने उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथील बाजपूर पोलीस स्टेशन परिसरात एका गन हाऊसवर छापा टाकला, जिथे ते शस्त्रांची तपासणी करत आहेत.

Back to top button