gadchiroli naxal : आणखी एका जहाल नक्षल्याचा मृतदेह सापडला | पुढारी

gadchiroli naxal : आणखी एका जहाल नक्षल्याचा मृतदेह सापडला

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा

कोरची तालुक्यातील (gadchiroli naxal) मर्दिनटोला पहाडावरील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेदरम्यान काल आणखी एका जहाल नक्षल्याचा मृतदेह सापडला आहे. सुखराम परचाके असे मृत नक्षल्याचे नाव असून, कोरची दलमचा विभागीय सदस्य होता.

१३ नोव्हेंबरच्या पहाटे मर्दिनटोला जंगलातील चकमकीत ठार झालेल्या २६ नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले होते. त्यात नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश होता. कालपर्यंत २६ पैकी १६ नक्षल्यांची ओळख पटली होती आणि त्यातील ८ नक्षल्यांचे मृतदेह त्यांचे नातेवाईक घेऊन गेले आहेत. (gadchiroli naxal)

आज दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे हेलिकॉप्टरने घटनास्थळी गेले होते. तेथे पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता सुखराम परचाके या डीव्हीसीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांनी नक्षल्यांकडे असलेले काही बॉम्ब नष्ट केले. सुखरामचा मृतदेह आढळून आल्याने आता ठार झालेल्या नक्षल्यांची संख्या २७ झाली आहे. (gadchiroli naxal)

हे ही वाचलं का?

Back to top button