Purvanchal Expressway; उत्तर प्रदेशाच्या विकासाचा नवा मार्ग | पुढारी

Purvanchal Expressway; उत्तर प्रदेशाच्या विकासाचा नवा मार्ग

पुढारी ऑनलाईन डेस्क :

उत्तरप्रदेशच्या विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, युपीची सत्ता काबीज केल्यानंतर लखनौ ते आझमगढ मार्गे गाझीपूर असा सहा पदरी “पुर्वांचल एक्स्प्रेस वे”च्या (Purvanchal Expressway) निर्मीतीचे काम सुरू केले होते. 341 किलोमीटरचा असणारा हा एक्सप्रेस वे अवघ्या 36 महिन्यांत तयार करण्यात आला असून, त्यासाठी 22 हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

या मार्गामुळे देशातील एकूण द्रुतगती मार्गामध्ये उत्तर प्रदेशचा वाटा आता 18 टक्क्यांवरून थेट 28 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
या द्रुतगती मार्गाच्या निर्मितीमुळे युपीच्या पूर्वेकडील शहरे राज्याच्या राजधानीबरोबरच देशाच्या राजधानीशी इतर द्रुतगती मार्गाद्वारे जोडली जाणार आहेत.

त्यामुळे पूर्वांचलमधील शहरांमधून वाहतुकीची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे. हा एक्स्प्रेस वे सध्याच्या आग्रा ते लखनऊ एक्सप्रेसवे आणि यमुना एक्सप्रेसवे बरोबरही जोडला जाणार आहे.

पुर्वांचल एक्स्प्रेस वेचे महत्व

  • सन 2019 मध्ये “पुर्वांचल एक्स्प्रेस वे”च्या (Purvanchal Expressway) निर्मीतीचे काम सुरू करण्यात आले होते.
  • 341 किमी लांबीचा 6 पदरी असणारा हा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे असून, त्याच्या बांधणीसाठी एकूण 22 हजार 494 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यामध्ये भूसंपादनाचाही खर्च समाविष्ट आहे.
  • युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीवेळी हवाई दलाच्या विमानांना आपत्कालीन परिस्थितीत उतरण्यासाठी या ठिकाणी हवाई पट्टी बांधण्यात आली आहे.
  • या मार्गाची सुरवात लखनौ-सुलतानपूर मार्गावरील चांदसराय गावापासून होते तर गाझीपूरमधील हैदरिया गावाजवळ तो समाप्त होतो.
  • हा एक्स्प्रेस वे युपीतील लखनौ, बाराबंकी, अयोध्या, अबिडकर नगर, अमेठी, सुलतानपूर,आझमगड,मऊ आणि गाझीपूर अशा 9 जिल्ह्यांतून जातो.
  • या एक्सप्रेस वे वर एकूण 18 फ्लाईओवर, 7 रेलवे ओवरब्रिज, 7 मोठे पुल, 118 छोटे पुल, 6 टोल प्लाजा, 5 रॅम्प प्लाजा, 271 बायपास तयार करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button