PM Kisan Yojana : पीएम किसानचा १० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा - पुढारी

PM Kisan Yojana : पीएम किसानचा १० वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशभरातील शेतकऱ्यांसाठी शुभवर्तमान. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (पीएमकेएसव्हाय) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये दोन हजार रूपये जमा करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणारा हा दहावा हफ्ता आहे. (PM Kisan Yojana)

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मदत म्हणून दर तीन महिन्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानूसार दोन हजारांचा हफ्ता जमा करण्यात येतो.

PM Kisan Yojana : या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.५८ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा

शेतकरी म्हणून नोंदणी असलेले ११.३७ कोटी नागरिक केंद्राच्या या योजनेचे लाभार्थी आहेत.

आतापर्यंत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.५८ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा झाले आहेत.

दरम्यान ज्यांना प्रधानमंत्री शेतकरी सम्मान निधीचा ९ हफ्ता मिळाला नव्हता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर यावेळी ९ आणि १० अशा दोन्ही हफ्त्यांचे मिळून एकूण चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति महिना ५०० रुपयांची मदत

शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांना केंद्राकडून दोन हजार रुपये देण्यात येतात. म्हणजेच सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति महिना ५०० रुपयांची मदत करण्यात येत आहे.

हे पैसे अडचणीच्या काळात वापरता येत असल्याने, शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे, असा दावा यानिमित्ताने केंद्राकडून केला जातो.

Back to top button