महाराष्ट्रात साकारणार कामाख्या देवीचे मंदिर : मुख्यमंत्री सरमा | Kamakhya Temple in Maharashtra | पुढारी

महाराष्ट्रात साकारणार कामाख्या देवीचे मंदिर : मुख्यमंत्री सरमा | Kamakhya Temple in Maharashtra

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात कामाख्या देवीचे भव्य मंदिर उभे राहाणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीची भक्त आहेत, उद्धव , ठाकरे यांची साथ सोडून राज्‍यात सरकार स्थापन करताना शिंदे आणि इतर आमदार गुवाहाटी येथे राहिले होते. तेथे त्यांनी कामाख्या देवीकडे नवस बोलला होता, असे सांगितले जाते.

सरमा म्हणाले, ” कामाख्या देवीच्‍या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परवानगी दिली आहे. आम्हाला या जागेवर फार चांगले मंदिर उभे करायचे आहे.”

आसाम राज्‍यात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी नीलाचल डोंगरावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. देशातील शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कामाख्या मंदिर होय.काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरच्या धर्तीवर कामाख्या देवी मंदिर परिसरातही कॉरिडॉर निर्मिती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी कामाख्या देवीची दर्शन घेतले होते, त्या वेळी त्यांची मुख्‍यमंत्री सरमा यांच्याशी भेट झाली होती. जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरमा मुंबईत शिंदे यांची भेटही घेणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button