कामाख्या देवी त्‍यांचा योग्‍य न्याय करेल : संजय राऊत

संजय राऊत
संजय राऊत
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन  महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्‍या समर्थक आमदार आणि खासदारांसोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत. कामाख्या देवी ही न्याय देणारी देवी आहे. त्‍यामुळे महाराष्‍ट्रात अन्याय करून तेथे गेलेल्‍यांचा कामाख्या देवी योग्‍य न्याय करेल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्‍हणाले. शिंदे सरकारवर टीका करताना राऊत यांनी महाराष्‍ट्राच्या सरकारला खोके सरकार म्‍हणून मान्यता मिळाली असल्‍याची टीकाही यावेळी केली.

शिंदे गट गुवाहाटीला गेलेल्‍या प्रश्नावर बोलाताना राऊत यांनी आसामचे मुख्यमंत्रीही पक्षांतर करून भाजपमध्ये गेले आहेत. त्‍यात एकनाथ शिंदे यांनी देखील पंक्षांतर केले आहे. त्‍यामुळे या दोघांचे जुळत असेल अशी मिश्किल टिपण्णी त्‍यांनी केली.

भाजपवर हल्‍ला चढवताना संजय राऊत यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं अस आवाहन केलं.

हेही वाचा :  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news