रेव्ह पार्टीत सापाचे विष : यूट्यूबर एल्विश यादवची ३ तास चौकशी | पुढारी

रेव्ह पार्टीत सापाचे विष : यूट्यूबर एल्विश यादवची ३ तास चौकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या आठवड्यात नोएडातील एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी ५ कोब्रा नागांसह अनेक जातींचे सर्प जप्त केले होते. सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये चमकलेला एल्विश यादव याचे नाव आरोपी म्हणून या प्रकरणात समोर आलेले आहे. यासंदर्भात नोएडा पोलिसांनी यूट्यूबर एल्विश यादव याची मंगळवारी (दि.८) तीन तास चौकशी केली.

एल्विश यादव सेक्टर-२० पोलीस ठाण्यात गुपचूप हजर झाला. आजही त्याची चौकशी होऊ शकते. नोएडामधील रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यानंतर आरोपींची चौकशी केली असता एल्विश यादवचे नाव पुढे आले. अटक केलेल्यांनी सांगितले की, एल्विश रेव्ह पार्ट्यांना साप पुरवायचा.

दरम्यान, वनविभागाने पाच सापांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. वैद्यकीय अहवालात नागाची विष ग्रंथी काढण्यात आली होती, तर उर्वरित चार साप विषारी नसल्याचे निष्पन्न झाले होते. वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयाच्या परवानगीने सापांना जंगलात सोडण्यात आले.

हेही वाचा : 

 

Back to top button