पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मंडे मोटीवेशनमध्ये (MondayMotivation) एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यातून त्यांनी विलक्षण समन्वय आणि टीमवर्कचे महत्त्व अधोरेखित केले आहे. तसेच हे तुम्ही तुमच्या कामात आणि कुटुंबात देखील करू शकता का? असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला आहे. (Anand Mahindra Video)
आनंद महिंद्रा यांनी हजारो हातांची हालचाल करणाऱ्या नृत्यांगनांचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत 'X' सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामधील अनेक नृत्यांगनांच्या हातांची सारखीच हालचाल दिसत आहे. यामधून यांच्यातील समन्वय आणि टीमवर्कचे दर्शन होत आहे. तसेच यामधून अभेद एकसंधपणाचा भ्रम निर्माण होत आहे. हे टीमवर्क करताना आवश्यक आहे, असेही महिंद्रा यांनी म्हटले आहे. (Anand Mahindra Video) तसेच सध्या विश्वचषक क्रीकेट स्पर्धेत देखील भारतीय संघ अशाच प्रकारे खेळत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. असाच विलक्षण समन्वय आणि एकसंधपणा आपण आपल्या कामात आणि कुटुंबियांसोबत देखील दाखवू शकतो का? असा प्रश्नही त्यांनी नेटकऱ्यांना केला आहे. (Anand Mahindra Video)