Anand Mahindra & Pradnyanand : आनंद महिंद्रा प्रज्ञानंदला देणार इलेक्ट्रिक कार | पुढारी

Anand Mahindra & Pradnyanand : आनंद महिंद्रा प्रज्ञानंदला देणार इलेक्ट्रिक कार

मुंबई, वृत्तसंस्था : Anand Mahindra & Pradnyanand : बुद्धिबळ वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना भारताचा 18 वर्षीय आर. प्रज्ञानंद आणि नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांच्यात खेळला गेला. या लढतीत त्याला विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली. प्रज्ञानंद भलेही इतिहास रचण्यास चुकला असेल; पण त्याने कोट्यवधी देशवासीयांची मने जिंकली आहेत. आता महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी प्रज्ञानंदसंदर्भात मोठी घोषणा केली असून, महिंद्रा इलेक्ट्रिक त्याला कार गिफ्ट करणार आहेत.

बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा आर. प्रज्ञानंद हा भारतातील दुसरा आणि सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. आनंद महिंद्रा यांनी त्याच्या पालकांना इलेक्ट्रिक कार भेट देण्याची घोषणा केली आहे. या कारचे नाव एक्सयूव्ही 400 आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या कारची किंमत अंदाजे 16 लाखांच्या आसपास आहे. (Anand Mahindra & Pradnyanand)

बुद्धिबळ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये 18 वर्षीय प्रज्ञानंदने सुरुवातीच्या दोन्ही गेममध्ये 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यातील सामना जवळपास 70 चालींनंतर अनिर्णीत राहिला. यानंतर दुसर्‍या दिवशी पुन्हा सामना झाला, तोही अनिर्णीत राहिला. तिसर्‍या दिवशी दोन्ही खेळाडूंमध्ये टायब्रेकर सामना झाला. ज्यामध्ये मॅग्नस कार्लसनने बाजी मारली; पण प्रज्ञानंदने आपल्या खेळाने कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली.

हेही वाचा…

Back to top button