Anand Mahindra Share Video : आनंद महिंद्रांची ‘त्या’ व्हिडिओवर कमेंट, ‘मी इथे झोपू शकणार नाही’

Anand Mahindra Share Video : आनंद महिंद्रांची ‘त्या’ व्हिडिओवर कमेंट, ‘मी इथे झोपू शकणार नाही’

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगात अशी अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आहेत जी लोकांना अनोखा अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नुकताच सोशल मीडियावर अशाच एका अनोख्या हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ शेअर (Share Video) केला आहे; पण त्यात एक ट्विस्ट आहे. हा व्हिडीओ एका भव्य अंडरवॉटर हॉटेलचा आहे.

Anand Mahindra Share Video : समुद्रसपाटीपासून १६ फूट खाली हॉटेल

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  मालदीवमध्ये असलेल्या या अंडरवॉटर हॉटेलचे मुराका असे नाव आहे. मुराका हॉटेल समुद्राच्या पृष्ठभागाखाली राहण्याचा एक अनोखा अनुभव देते. सागरी जीवनाचे मंत्रमुग्ध करणारी दृश्ये पाहायवयास मिळतात. महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओतून हे हॉटेल पाहायला मिळाते.

Anand Mahindra : या हॉटेलमध्ये झोपून रात्र काढणं माझ्यासाठी कठीण

महिंद्रा यांच्या पोस्टमधील कमेंटवरुन असे जाणवते की, हे हॉटेल फारच आकर्षित करणारे आहे. मात्र त्यांनी एक गोष्ट सांगितली की ज्यामुळे हे हॉटेल भीतीदायक असल्याचा भास होतो. ते म्हणतात की, "या हॉटेलमध्ये रात्र घालवण्याचे धाडस मी करणार नाही. कारण मी झोपलो असलो तरीही आजूबाजूच्या काचेला जर तडा गेला तर काय होईल याचा विचार करुन रात्रभर जागून यावर लक्ष ठेवावे लागेल. त्यांची ही कमेंट आणि व्हिडिओ हे हॉटेलच्या संपूर्ण रचनेवर लक्ष केंद्रीत करणारे आहे. मात्र ही कमेंट महिंद्रा यांनी गंमत म्हणून केली असल्याचे देखील पुढे म्हटले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news