Gujarat Accident : गुजरातच्या पंचमहालमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस उलटली, ३८ जण जखमी | पुढारी

Gujarat Accident : गुजरातच्या पंचमहालमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस उलटली, ३८ जण जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील हालोल येथे सोमवारी (दि.३१) मोठा अपघात झाला. राज्य राखीव पोलीस (SRP) जवानांना घेवून जाणारी बस डोंगराळ भागात उलटली. या अपघातात ३८ जवान जखमी झाले, त्यापैकी ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस उतारावरून खाली जाऊन उलटली.

संबंधित बातम्या : 

प्रशिक्षण पूर्ण करून परतताना अपघात

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पावागडच्या पायथ्याशी डोंगराळ भागात तीन दिवस गोळीबाराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवान दाहोदला परतत होते. कच्च्या रस्त्यावरून बस खाली उतरताना ब्रेक निकामी झाले. त्यामुळे सुमारे ५० जवान असलेली बस उलटली.

९ जवान गंभीर जखमी

पोलीस निरीक्षक आर. ए. जडेजा यांनी सांगितले की, “अपघाताच्या वेळी बसमध्ये ५० जवान होते. त्यापैकी ३८ जवान जखमी झाले असून त्यांना हलोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी २९ जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या नऊ जणांना पुढील उपचारासाठी वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button