गँगरेप प्रकरणी यूपीच्या माजी मंत्री गायत्री प्रजापती याला आजन्म जन्मठेप | पुढारी

गँगरेप प्रकरणी यूपीच्या माजी मंत्री गायत्री प्रजापती याला आजन्म जन्मठेप

पुढारी ऑनलाईन डेस्क

अल्पवयीन मुलीवर अत्याचार व महिलेवर सामूहिक गँगरेप  प्रकरणी उत्तर प्रदेशचा माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती याला आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रजापतीचे दोन साथीदार आशिष शुक्ला आणि अशोक तिवारी यांनाही आजीवन कारावास सुनावला आहे. त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

या प्रकरणातील संशयित आराेपी अमरेंद्र सिंग उर्फ पिंटू सिंह, विकास वर्मा , चंद्रपाल व रुपेश्वर उर्फ रुपेश यांची पुराव्याअभावी सुटका केली. या सगळ्यांविरोधात पोलिसांत आराेपपत्र दाखल केले होते. चित्रकूट येथील पीडितेने १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी गौतम पल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने या तक्रारीत उत्तर प्रदेश सरकारमधील तत्‍कालिन खाणमंत्री गायत्री प्रजापती याच्यासह अन्य आरोपींवर तिच्यासह तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद दिली होती.

तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, खाणीवर काम देण्याचे आमिष दाखवून तिला लखनौ येथे बोलावून गेतले. त्यानंतर तिला अनेक ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केले. तिने याबाबत आपली विस्तृत तक्रार पोलिस महासंचालकांना दिली. त्यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सर्व आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.
गायत्री प्रजापतीने दाखल केलेली याचिका अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने फेटाळली होती.

गॅँगरेप गायत्री प्रजापती : अमेठीत तणावपूर्ण शांतता

समाजवादी पक्षाचे वजनदार नेते अशी गायत्री प्रजापती याची ओळख होती. शुक्रवारी त्याला आजीवन कारवासाची शिक्षा सुनावल्यानंतर अमेठीत तणावपूर्ण शांतता पसरली.दोन सहकाऱ्यांनाही शिक्षा सुनावल्याने गायत्री प्रजापतीसाठी हा माेठा धक्‍का मानला जात आहे.

दोन दिवसांपूर्वी कोर्टाने ठरवले होते दोषी

गँगरेप आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गायत्रीसह त्याच्या दोन सहकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी कोर्टाने दोषी ठरविले होते. त्यानंतर शुक्रवारी निकाल दिला. त्यात त्यांना आजन्म जन्मठेप सुनावली. गायत्री प्रजापतीविरोधात ठोस पुरावे असल्याने त्याला कठोर शिक्षा होईल असा अंदाज व्‍यक्‍त हाेत हाेता.

आराेपी अशोक तिवारी करोडपती

गायत्री प्रजापतीसोबत शिक्षा सुनावलेल्या अशोक तिवारी हा लेखापरीक्षक आहे. तो २०१७ पासून जेलमध्ये आहे. आंबेडकर नगरमध्ये राहणारा तिवारी हा अमेठीत नोकरीस होता. त्यानंतर त्याची प्रजापतीशी जवळीक वाढली. आधी आमदार आणि नंतर मंत्री बनल्यानंतर प्रजापतीने त्याला लखनौला नेले. प्रजापतीसह तोही या प्रकरणात अडकला आहे. गायत्रीचा तो निकटवर्तीय बनल्यानंतर त्याने अमाप संपत्ती कमावली. त्याने अमेठीजवळ एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अलिशान घर बांधले आहे. त्याव्यतिरिक्त मोठी संपत्ती कमावल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button