NEET Exam : प्रेरणादायी..! मुलीसाेबत न्यूरो सर्जन वडिलांनीही दिली ‘नीट’, दोघांच्‍या गुणांत केवळ… | पुढारी

NEET Exam : प्रेरणादायी..! मुलीसाेबत न्यूरो सर्जन वडिलांनीही दिली 'नीट', दोघांच्‍या गुणांत केवळ...

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक पालक आपल्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी विविध प्रयत्न करत असतो. एका वडिलांनी आपल्या मुलीला प्रेरित करण्याचा एक अनोखा मार्ग शोधला. प्रयागराजमधील न्यूरो सर्जन असणार्‍या वडिलांनी आपल्या लेकीला प्राेत्‍साहन देण्‍यासाठी तिच्‍या सोबत नीटची (NEET Exam) परीक्षा दिली. दोघेही परीक्षा उत्तीर्ण झाले. डॉक्टरांना ८९ तर मुलीला ९० टक्के गुण मिळाले आहे.

दोघे मिळून परीक्षेची तयारी करू लागले…

कोविड महामारीच्या काळात डाॅक्‍टर खेतान यांची मुलगी मितालीची अभ्यासातील आवड कमी झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला; पण मिताली घरी परतली. त्यानंतर डाॅ. खेतान यांनी आपल्‍या मुलीला प्राेत्‍साहन देण्‍यासाठी एक निर्णय घेतला. त्‍यांनीही आपल्‍या मुलीसाेबत नीट परीक्षा द्यायचे ठरवले. दोघे मिळून परीक्षेची तयारी करू लागले.

संबंधित बातम्या

डॉ खेतान सांगतात की, मला माझ्या मुलीला नीट मध्ये यशस्वी पाहायचे होते. त्यासाठी मीही तिच्यासोबत तयारी केली. परीक्षाही दिली.  मुलगी मितालीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केली. जूनमध्ये निकाल लागला तेव्हा मुलगी मितालीला ९० टक्के, तर डॉक्टरांना ८९ टक्के गुण मिळाले होते. त्यांनी मितालीला जुलैमध्ये कर्नाटकातील मणिपाल येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसमध्ये प्रवेश मिळाला आहे.

मुलीचा यशातच माझा विजय…

नीटच्या तयारीच्या वेळी ते नियमितपणे OPD मध्ये रुग्‍ण तपासणी करायचे.  या काळात जो काही वेळ मिळेला नीट परीक्षेचा अभ्यास करायचे. लेकीने घरात जास्त अभ्यास कोण करणार याची स्पर्धा लावली होती. या स्पर्धेमुळे तिने जास्त मेहनत घेतली. त्यामुळे तिने माझ्यापेक्षा जास्त गुण मिळवले. या पराभवात मला जो आनंद झाला तो अवर्णनीय आहे, असेही डॉ खेतान अभिमानाने सांगतात.

हेही वाचा

Back to top button