NEET EXAM रद्द करण्याच्या विनंतीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली - पुढारी

NEET EXAM रद्द करण्याच्या विनंतीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

NEET EXAM वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या नीट परिक्षेचा पेपर फुटला होता. त्यामुळे गेल्या १२ सप्टेंबर रोजी झालेली नीट परिक्षा रद्द करावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. परिक्षा रद्द करण्याची मागणी करणारे विद्यार्थी नगण्य आहेत. तर दुसरीकडे परिक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, अशी टिप्पणी न्यायमूती एल. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केली.

सर्वोच्च न्यायालयाची ४३ शेतकरी संघटनांना नोटीस

नीट परिक्षेत गडबड झाल्याचा आरोप करणारे तीन गुन्हे सीबीआयने दाखल केलेले आहेत. त्यामुळे ही परिक्षा रद्द करुन पुन्हा नव्याने तिचे आयोजन करावे, असे याचिकाकत्याने म्हटले होते. नीट परिक्षेचा मुद्दा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत आहे. ही परिक्षा रद्द केली जावी, असे तुम्ही कसे म्हणू शकता, असा सवाल न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी सुनावणीदरम्यान केला. यावर नीट परिक्षेचा पेपर व्हाट्सअपवर लिक झाला होता, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांचे वकील निनाद डोगरा यांनी केला. अखेरीस खंडपीठ याचिका फेटाळून लावली.

अधिक वाचा :

Back to top button