JEE NEET Exam : जेईई, नीटच्या तारखा जाहीर; असे असेल वेळापत्रक? | पुढारी

JEE NEET Exam : जेईई, नीटच्या तारखा जाहीर; असे असेल वेळापत्रक?

पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) पुढील वर्षी होणार्‍या संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE MAINS), राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसह (NEET) होणार्‍या विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जेईई दोन टप्प्यांत होणार आहे, अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे. जेईईचा पहिला टप्पा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत, तर नीट परीक्षा 5 मे रोजी होणार आहे. जेईई परीक्षेचा पहिला टप्पा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे, तर दुसरा टप्पा 1 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत होणार आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नीट परीक्षा 5 मे रोजी नियोजित आहे.

देशभरातील केंद्रीय, सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी-यूजी) 15 ते 31 मेदरम्यान होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी (पीजी) अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त विद्यापीठ प्रवेश परीक्षा सीयूईटी-पीजी 11 ते 28 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. परीक्षांबाबतची सविस्तर माहिती नोंदणी प्रक्रिया सुरू करताना प्रसिद्ध केली जाईल.

नेट परीक्षा 10 ते 21 जूनदरम्यान

विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकपदासाठी पात्रता परीक्षा यूजीसी नेट ही 10 ते 21 जूनदरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

हेही वाचा

Pune Accident : नगर-कल्याण महामार्गावर पिकअपची दुचाकीला जोरदार धडक; पती ठार, तर पत्नी गंभीर

Nashik Ganeshotsav : रिमझिम पावसात नाशिककरांनी केले लाडक्या बाप्पाचे स्वागत

रांगड्या कोल्हापुरी कलापथकांची मुलूखगिरी

Back to top button