P Chidambaram : ‘बाबरी’ संदर्भातील निकाल ‘त्‍यामुळेच’ योग्‍य ठरला | पुढारी

P Chidambaram : 'बाबरी' संदर्भातील निकाल 'त्‍यामुळेच' योग्‍य ठरला

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

बाबरी मशीद पाडणे ही एक दुर्दैवी घटना होती. खूप काळ गेल्‍यानंतर बाबरी मशीदसंदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेला निकाल हा दोन्‍ही बाजूंनी मान्‍य केला. त्‍यामुळे तो निकाल योग्‍य ठरला, असे मत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पी चिदंबरम
( P Chidambaram ) यांनी व्‍यक्‍त केले. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्‍या ‘सनराइज ओव्‍हर अयोध्‍या’ या पुस्‍तकाच्‍या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.

या वेळी पी. चिदंबरम म्‍हणाले, जवाहरलाल नेहरु, महात्‍मा गांधी आणि एपीजे अब्‍दुल कलाम यांच्‍या देशात बाबरी मशीदसंर्भात काढण्‍यात आलेला निष्‍कर्ष नेहमीच भय निर्माण करणारा ठरेल. स्वातंत्र्याची ७५ वर्ष झाली तरीही बाबरी मशीद कोणी पाडली नाही, हे सांगताना आपल्‍याला लाज वाटत नाही, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

६ डिसेंबर १९९२ रोजी जे काही घडलं ते खूपच चुकीचे होते. या प्रकरणातील सर्व आरोपींची सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्दोष मुक्‍तता केली. जेसिका लालची हत्‍या कोणी केली नाही. तसेच बाबरी मशीद कोणीही पाडली नाही, असेही चिदंबरम म्‍हणाले.महात्‍मा गांधी ज्‍या रामराज्‍याचा विचार करत होते याचा अर्थच काही लोकांना समजलाच नाही. पंडित जवाहरलाल नेहरु धर्मनिरपेक्षतेबाबत बोलत. धर्मनिरपेक्षतेचा स्‍वीकारातून सहनशीलता तयार होते. सहनशीलतेमधून सह अस्‍तित्‍वासाठी वातावरण तयार होते, असेही चिदंबरम म्‍हणाले. गांधीजी ज्या रामराज्याचा विचार करत होते ते रामराज्य आता राहिलेले नाही.

 (  P Chidambaram ) सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निकालावर केले सवाल

यावेळी बाबरी मशीदसंदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निकालावरही चिदंबरम यांनी सवाल केले. ते म्‍हणाले, खूप काळ गेल्‍यानंतर बाबरी मशीदसंदर्भात सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेला निकाल हा दोन्‍ही बाजूंनी मान्‍य केला. त्‍यामुळे तो निकाल योग्‍य ठरला. दुसरा पर्यायही नव्‍हता. दोन्‍ही पक्षांनी मान्‍य केले तरी हा योग्‍य निर्णय नव्‍हता, असेही ते म्‍हणाले.

वाजपेयींचा गांधीवादी समाजवाद ठरला अपयशी : दिग्‍विजय सिंह

यावेळी काँग्रेसचे नेता दिग्‍विजय सिंह म्‍हणाले, १९८४मध्‍ये भाजपचे लोकसभेत केवळ दोनच खासदार होते. यानंतर त्‍यांनी राम जन्‍मभूमीचा मुद्‍दा उपस्‍थित करण्‍याचा निर्णय घेतला. कारण अटल बिहारी वाजपेयी यांचा गांधीवादी समाजवाद १९८४मध्‍ये अपयशी ठरला होता. त्‍यामुळे त्‍यांना धार्मिक कट्‍टरवादाच्‍या मार्गाने जाण्‍याचा निर्णय घेणे भाग पडले. लालकृष्‍ण अडवाणी यांची रथयात्रा ही समाजात दुही निर्माण करणारी ठरली. या रथयात्रेने समाजात व्‍देष निर्माण करण्‍याचे काम केले, असेही दिग्‍विजय सिंह यांनी सांगितले.

हेही वाचलं का?

 

 

 

Back to top button