१९७१ च्या बांगला देश मुक्ती संग्रामचे मुख्य म्हणून ओळख असलेले कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कर्नल झहीर यांचा १९७१ मध्ये झालेल्या भारत, पाकिस्तान युद्धातील त्यांनी केलेल्या पराक्रमाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी पुर्व पाकिस्तानला (आताचा बांगला देश) मुक्त करण्यासाठी जे पाऊल उचलले उचलेले यामुळे त्यांची पुढची ५० वर्षे नायक म्हणून ओळख राहिली. कर्नल काझी सज्जाद अली झहीर म्हणतात, १९७१ च्या मुक्तिसंग्रामात पाकिस्तानच्या युद्ध योजनांवर जी काही गुप्त माहिती मिळेल ती घेऊन मी फक्त २० रुपये आणि आहे त्या कपड्यावर पळून आलो होतो. पाकिस्तानी सैन्यात अधिकारी होण्यापासून ते पूर्व पाकिस्तानला मुक्त करण्यात गुंतलेली प्रमुख व्यक्ती बनण्यापर्यंतचा माझा प्रवास थक्क करणारा असल्याचे ते सांगतात.
७० वर्षीय कर्नल झहीर यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्नल झहीर यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना आपल्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक पुरस्कार हा मैलाचा दगड असतो, पण पद्मश्री माझ्यासाठी खास आहे. याचे कारण बांगला देश मुक्तिसंग्रामाची माझ्या मनात कायम मशाल पेटत राहिल. झहीर १९६९ च्या उत्तरार्धात पाकिस्तानी सैन्यात दाखल झाले. यावेळी त्यांची आर्टिलरी कॉर्प्समध्ये नियुक्ती झाली. मात्र, पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) पाकिस्तानी लष्कराकडून होत असलेल्या अत्याचाराची माहिती ऐकून ते देश सोडून भारतात पोहोचले.
झहीर पुढे म्हणाले, मी उच्चपदस्थ १४ पॅरा ब्रिगेडच्या युनिटचे काम पहायचो, पण पूर्व पाकिस्तानमध्ये होणाऱ्या अत्याचारांनी मला हादरवून सोडले.
त्याचक्षणी मी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि सांबा बॉर्डरमार्गे जम्मू-काश्मीरला पोहोचलो. अंगावर कपडे आणि माझ्याकडे २० रुपये होते. पण पाकिस्तानने जो काही प्लॅन केला होता त्या संबंधीत असलेली सगळी युद्धनितीशी संबंधित कागदपत्रे घेऊन भारतीय लष्करामध्ये दाखल झालो.
दरम्यान, पाकिस्तान लष्कराकडून कर्नल झहीर यांना मृत्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या ५० वर्षापासून पाकिस्तान त्यांना शोधत आहे. पाकिस्तानी लष्कराकडून त्यांच्याविरुद्ध फाशीचे वॉरंट जारी करण्यात आले, ही माझ्यासाठी आजही सन्मानाची बाब असल्याचे ते सांगतात.
पाकिस्तानमुळे माझ्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. वडिलांचे ढाक्यातील छोटेसे घर जाळून टाकण्यात आले. माझी आई आणि बहिणीला पाकिस्तानी सैनिकांनी प्रचंड छळले. शेवटी त्यांना सुरक्षित निवारा मिळाल्यावर त्यांना छोटासा आधार मिळाला होता. या पराक्रमासाठी कर्नल झहीर यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.