Malik vs Fadnavis : नवाब मलिकांच्या मुलगीकडून फडणवीसांना नोटीस; 'माफी मागा अन्यथा...' | पुढारी

Malik vs Fadnavis : नवाब मलिकांच्या मुलगीकडून फडणवीसांना नोटीस; 'माफी मागा अन्यथा...'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

Malik vs Fadnavis : ड्रग्ज आणि अंडरवर्ल्डशी संबंध अशा प्रकारचे आरोप- प्रत्योराप करुन मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या जोरदार सामना सुरु आहे. दरम्यान, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. याबाबतची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फडणवीस यांनी माफी मागितली नाही तर निश्चितपणे त्यांच्या विरोधात फौजदारी अथवा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला जाईल, अशा इशारा मलिक यांनी दिला आहे.

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा दावाही फडणवीस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर निलोफर मलिक यांनी फडणवीस यांना अब्रु नुकसानीची नोटीस बजावली आहे.

तर याआधी ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांचे कनेक्शन असल्याचा आरोप करत मलिक यांनी कारागृहात असलेल्या जयदीप राणांचा फोटो ट्विट केला होता. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर असून त्याच्यासोबत एका फोटोत फडणवीस दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आशीर्वादानं ड्रग्ज कारभार सुरु होता. याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्यावर फडणवीस यांनी उत्तर देत मलिकांवर हल्लाबोल केला होता.

Malik vs Fadnavis : ‘गुजरातमधून ड्रग्जचे देशभर वितरण रॅकेट’

गुजरातमधील द्वारकेत ३५० कोटींचे ड्रग्ज सापडल्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. गुजरातमध्ये समुद्रीमार्गे येणारे ड्रग्ज देशभर जात आहे. माझ्या जावयाच्या घरात ड्रग्ज सापडल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आता ड्रग्जचा खेळ गुजरातमधून सुरु आहे. गुजरातमध्ये येणारे ड्रग्ज देशभर वितरण करण्याचे रॅकेट सुरु आहे. मनिष भानुषाली, किरण गोसावी, सुनील पाटील यांचे गुजरात कनेक्शन आहे. गुजरातमधून ड्रग्ज व्यवहार चालवला जात असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. गुजरात ड्रग्ज प्रकरणाचा तपाय एनआयए, एनसीबी या तपास यंत्रणा योग्य दिशेने करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : शिवप्रताप दिन विशेष : अफझलखानाचा कोथळा काढलेली वाघनखं सध्या कुठयंत? | Shivpratap Din Special

Back to top button