building collapse: जळगावात इमारत कोसळली, ७० वर्षीय आजीबाई ढिगा-याखाली दबूनही वाचल्या | पुढारी

building collapse: जळगावात इमारत कोसळली, ७० वर्षीय आजीबाई ढिगा-याखाली दबूनही वाचल्या

जळगाव; नरेंद्र पाटील : building collapse : येथील शनी पेठ परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १७ जवळील दोन मजली इमारत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोसळली. या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आजीबाईंचे नशीब बलवत्तर होते म्हणून ढिगाऱ्याखाली राहुनी त्या वाचल्या. यात नातू रोहित शेजारी कृणाल पाटील यांनी दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आजीला ढिगारा पाहून काढले आजी वर खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, शनिपेठ भागातील महानगरपालिकेच्या शाळा क्र. १७ जवळ असलेली दुमजली इमारत पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीमध्ये खालच्या मजल्यावर राहणारे रमेश पाटील, त्यांच्या पत्नी शोभा पाटील मुलगा रोहित पाटील, अजित कलाबाई पाटील (वय ७०) हे कुटुंब राहते. रमेश पाटील यांना दोन मुली असून त्यांची नावे सोनाली पाटील व गायत्री पाटील असे आहे. दोघी विवाहित आहेत. दिवाळी सणानिमित्त त्या दोघी माहेरी आल्या होत्या. नेहमीप्रमाणे कामे आटपून रमेश पाटील यांचे कुटुंबिय झोपी गेले होते. दरम्यान, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रोहित पाटील याला वाळू पडण्याचा आवाज आला. तो झोपेतून उठला. त्यानंतर त्याने वाळू पडताना पाहिले. त्याने सर्वांना झोपेतून जागे केले आणि इमारतीतून दूर पाठवले. आजी कलाबाई पाटील यांना घराबाहेर काढण्या आधीच भिंत कोसळली. आजी ढिगार्‍याखाली दाबली गेली.

इमारत कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे शेजारी राहणारे कुणाल महाजन हे सुद्धा घराबाहेर आले. त्यांना इमारत पडलेली दिसली. आजी या ढिगाऱ्याखाली दाबली गेल्याचा रोहितने आरडाओरडा केला. काहीवेळाने कृणाल महाजन यांनी रोहितला बरोबर घेऊन कोसळलेल्या इमारतीचे ढिगारे बाजूला करण्यास सुरुवात केली. जवळपास एक ते दीड तासाच्या अवधीनंतर कृणाल महाजन यांनी मातीच्या ढिगार्‍या खाली जाऊन आजीला बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले. आज्जींच्या बरगड्या, हात, पाय यांना मार लागला आहे. त्यांच्यावर उपाचार सुरू करण्यात आले आहेत.

Back to top button