Stock Market Updates | इस्रायल- हमास युद्धाचे शेअर बाजारात पडसाद, काय आहे स्थिती?

Stock Market Updates | इस्रायल- हमास युद्धाचे शेअर बाजारात पडसाद, काय आहे स्थिती?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत आणि मध्य पूर्वेतील इस्रायल- हमास युद्धाच्या (Israel-Hamas War) भीतीमुळे तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता यामुळे भारतीय शेअर बाजार सोमवारी सलग तिसऱ्या सत्रात घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी घसरून ६६,१२८ वर आला. तर निफ्टी १९,७५० वर होता. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट झाले.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्स आज ६६,२३८ वर खुला झाला. त्यानंतर तो ६६ हजारापर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर नेस्ले इंडिया, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स घसरले. तर एचसीएल टेक, टायटन, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले आहेत.

जागतिक बाजार, गुंतवणूकदारांची सावध भूमिका

आज जागतिक बाजारात घसरण दिसून आली. गाझामधील तीव्र संघर्ष आणि युद्धाची व्याप्ती वाढणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. आशियाई बाजारातील जपानचा निक्केई २२५ निक्केई १.९ टक्क्यांनी घसरला, तर चीनचा शांघाय कंपोझिट ०.४ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँग सेंग ०.२ टक्क्यांनी खाली आला.

परदेशी गुंतवणूकदार खरेदीसाठी परतले

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) शुक्रवारी १७ व्या दिवशी भारतीय बाजारातील शेअर्स विक्रीचा सिलसिला थांबवला. त्यांनी एका दिवसात ३१७ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स खरेदी केले. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी ९,७८४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली आहे. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी १०३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

तेलाच्या किमती

सोमवारी तेलाच्या किमती किरकोळ घसरल्या. पण इस्रायल- हमास युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढू शकतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला नवीन धक्का बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ब्रेंट फ्यूचर्स ०.३ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९०.८७ डॉलरवर आले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड प्रति बॅरल ०.४ टक्क्यांनी घसरून ८६.३४ डॉलरवर आले.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news