Sanjay Raut on ED : खा. संजय सिंह यांच्‍यावर कारवाई; राऊत म्‍हणाले, ‘सरकारविरोधी बोलेल त्याला…’ | पुढारी

Sanjay Raut on ED : खा. संजय सिंह यांच्‍यावर कारवाई; राऊत म्‍हणाले, 'सरकारविरोधी बोलेल त्याला...'

पुढारी ऑनलाईन:  आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर ‘ईडी’ने बुधवारी (दि.०४)  छापेमारी केली. यानंतर त्‍यांना अटकही करण्‍यात आली. यावर कारवाईवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्‍हटलं आहे की,  ‘जो कोणी केंद्र सरकारविरोधी बोलेल त्याला ईडी, आयकर आणि सीबीआयचा सामना करावाच लागेल’, ( Sanjay Raut on ED)

संबंधित बातम्‍या :

राऊत म्हणाले की, “हे केवळ आम आदमी पक्षाच्या बाबतीतच घडत नाही. यापूर्वी आम्हीही यातून गेले आहोत. बुधवारी ज्या प्रकारे संजय सिंह यांना अटक करण्यात आली त्याचा मी आणि माझा पक्ष निषेध करतो. मी आज संजय सिंग यांची भेट घेणार आहे.” ( Sanjay Raut on ED)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला निर्दोष समजत असतील, तर ते पुढे येऊन संसदेत भ्रष्टाचारावर चर्चा का करत नाहीत, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.  ( Sanjay Raut on ED)

हेही वाचा :

 

 

Back to top button