Pune Vaishali hotel :वैशाली हॉटेलच्या मालकिणीची पतीनेच केली फसवणूक; बनावट सह्या करुन काढले पाच कोटींची कर्ज | पुढारी

Pune Vaishali hotel :वैशाली हॉटेलच्या मालकिणीची पतीनेच केली फसवणूक; बनावट सह्या करुन काढले पाच कोटींची कर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वैशाली हॉटेलच्या मालकिणीची बनावट स्वाक्षरी करून सदनिकेवर पाच कोटी रुपयांचे तारण कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैशाली हॉटेलच्या मालकिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह बँक अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निकिता जगन्नाथ शेट्टी (वय 34, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विश्वजीत विनायक जाधव (वय 41) यांच्यासह कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात वैशाली हॉटेलच्या मालकीवरून वाद सुरू आहेत. याबाबत दोघांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. निकिता यांना विश्वासात न घेता पती विश्वजीत यांनी बँक अधिकार्‍यांची भेट घेतली. निकिता यांची बनावट स्वाक्षरी करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. निकिता यांच्या परवानगीशिवाय सदनिका बँकेकडे तारण ठेवून चार कोटी 97 लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे निकिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा

Ujjain Case : उज्जैन अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला

आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर : जयंत पाटील

Sangli News : विजेच्या शॉकने अख्खे कुटुंब संपवण्याचा प्रयत्न

Back to top button