Sanjay Raut : नवीन संसद भवन केवळ 'मेगा शो'- संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : नवीन संसद भवन केवळ 'मेगा शो'- संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क: जेव्हा मी संसद भवनाच्या नवीन इमारतीत जातो, तेव्हा मला वाटत नाही की मी एका ऐतिहासिक इमारतीत जात आहे. हे हॉटेल किती स्टारचे आहे नाही माहित, पण नवीन संसद भवन एक मेगा शो होता, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut)

राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, जेव्हा मी जुन्या संसदेच्या इमारतीत जातो तेव्हा मला वाटते की इतिहास माझ्यासोबत चालत आहे. नवीन संसद भवनाला ना कोणता इतिहास, ना वर्तमान अशी खंत देखील शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. (Sanjay Raut)

नवीन संसद भवन हे एक 7-स्टार हॉटेल आहे, असे लोक म्हणतात. तर काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी म्हटल्याप्रमाणे ते मोदींचे मल्टिप्लेक्स आहे, असे देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Sanjay Raut)

हेही वाचा:

 

Back to top button