Bharti Pawar : आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ, चौघांवर गुन्हा | पुढारी

Bharti Pawar : आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ, चौघांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांच्या गंगापूर रोडवरील निवासस्थानाच्या आवारात आरडाओरड करून पोलिस व मंत्र्यांचे स्वीय सहायकांच्या शासकीय कामात अडथळा आणून आंदोलनाची धमकी दिल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात महिला वकिलासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांच्या गंगापूर रोडवरील आनंदनगर परिसरातील निवासस्थानी असलेल्या कार्यालयात मंगळवारी (दि. ३) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. डॉ. पवार यांच्याकडे पत्रकार परिषद सुरू असताना संशयित ॲड. अलका शेळके-मोरे पाटील यांच्यासह एक महिला व इतर दोन पुरुषांनी तेथे येत आरडाओरड केला. बंदोबस्तावरील पोलिसांसह डॉ. पवार यांच्या स्वीय सहायकाच्या शासकीय कामात अडथळा आणत आंदोलनाची धमकी दिली. या प्रकरणी चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. डॉ. पवार यांनी एका आंदोलनस्थळी भेट द्यावी या मागणीसाठी संशयित आल्याचे समजते. मात्र, त्यांनी गैरवर्तन केल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button