Ujjain Case : उज्जैन अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला | पुढारी

Ujjain Case : उज्जैन अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्यप्रदेशमधील  उज्जैन येथील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवरीलअत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ऑटोचालक भरत सोनी याचे घर बुधवारी (दि.४) बुलडोझरच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले आहे. (Ujjain Case)

संबधित बातम्या

काय आहे प्रकरण 

मध्य प्रदेश राज्यातील उज्जैनमध्‍ये नराधमांनी पीडित मुलीवर बलात्कार करून तिला रस्त्यावर फेकले. यानंतर ही अल्पवयीन मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेतच अनेकांकडे मदत मागत आहे; परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.  पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणावरील आठ किमीच्या अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्या आधारे  ऑटो चालक  राकेश (३८) याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. ऑटोमध्ये रक्ताचे डागही आढळून आले.

Ujjain Case : बेकायदेशीरपणे’ घर बांधण्यात आले होते

आरोपी सोनी याचे  उज्जैनमधील नानाखेडा भागात सरकारी जमिनीवर ‘बेकायदेशीरपणे’ घर बांधण्यात आले होते, ज्यामध्ये तो आई-वडील, भाऊ आणि मेहुणासोबत राहत होता. बुधवारी (दि.४) अधिकाऱ्यांनी हे घर रिकामे करून बुलडोझरने जमीनदोस्त केले. भरत सोनीच्या वडिलांनी या गुन्ह्यात दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षेची मागणी केली आणि फाशी किंवा गोळ्या घातल्या पाहिजेत असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा 

Back to top button