

पुढारी ऑनलाईन : इटलीतील व्हेनिस पुलावरून Italy Bus Accident प्रवाशांनी भरलेली बस खाली पडली. या भीषण अपघातात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समाेर येत आहे. मिथेन गॅसवर चालणारी बस (मंगळवार) व्हेनिसमधील पुलावरून पडली. यानंतर या बसला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोन मुले आणि परदेशी नागरिकांसह 21 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
१८ लोक जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर
युक्रेनियनसह परदेशी पर्यटकांना घेऊन जाणारी बस इटलीच्या व्हेनिस शहराजवळील एका उंच पुलावरून खाली कोसळली. ज्यामध्ये कमीत कमी २१ लोकांचा मृत्यू झाला. तर जवळपास १८ लोक जखमी झाले. व्हेनिस शहराचे अधिकारी रेनाटो बोरासो यांनी सांगितले की, मंगळवारी ऐतिहासिक शहर व्हेनिसच्या मेस्त्रे बरो मधील अपघातातील जखमी ४ लोकांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातातील मृतांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे.
हेही वाचा :