Vaidyanath Sugar Factory : वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई करणाऱ्यांच्या तोंडावर १९ कोटी फेकू: बीडमधील मुंडेप्रेंमी आक्रमक

Vaidyanath Sugar Factory : वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई करणाऱ्यांच्या तोंडावर १९ कोटी फेकू: बीडमधील मुंडेप्रेंमी आक्रमक

बीड, पुढारी वृत्तसेवा: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या धाडसाने अन् जिद्दीने परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्याचे धाडस केले. नुसते धाडसच नव्हे तर दोन- तीन वर्षात त्यांनी वैद्यनाथला नंबर एकचा सहकारी कारखाना बनवले. वैद्यनाथच्या माध्यमातून बंद पडलेले अनेक कारखाने चालवायला घेऊन ते सुरळीतपणे चालवून दाखवले. हे सारे करताना लोकनेते मुंडे यांच्यासमोर एकमेव ध्येय ते शेतकरी अन् कामगारांच्या हिताचे. (Vaidyanath Sugar Factory)

संबंधित बातम्या 

या कारखान्याच्या उभारणीतून ऊसतोड मजूर असो या ऊस उत्पादक शेतकरी, मुकादम, वाहतुकदार यांना आपल्या जिल्ह्यात आपल्या हक्काचा मोठा साखर कारखाना मिळाला. लोकनेते मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यामुळे शेतकरी, कामगार, कारखान्याशी संबंधित इतर वर्गाचे जीवनमान उंचावले. दरम्यान दुर्दैवाने लोकनेते मुंडे यांचे अपघाती निधन झाले. दरम्यानच्या काळात सलग चार वर्षे भीषण दुष्काळ पडला. यामुळे वैद्यनाथ साखर कारखाना थोडा अडचणीत आला. परंतु, भाजपची राज्यात, देशात सत्ता असताना इतर अनेक कारखान्यांना कर्ज मिळाले. कर्जात सवलती मिळाल्या. एकमेव वैद्यनाथ साखर कारखान्याला मदत मिळाली नाही. त्यानंतर जीएसटीची रक्कम थकली म्हणून कारखान्यावर कारवाई करण्यात आली. (Vaidyanath Sugar Factory)

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांना सतत डावलण्यात आले. पंकजा मुंडे यांच्यामुळे भाजपच्या २५ पेक्षा अधिक जागा निवडून आल्या, परंतु पक्षातीलच काही झारीच्या शुक्राचार्यांनी घात केल्याने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना विधान परिषद अथवा पक्षीय संघटनेतील तोलामोलाचे पद देणे गरजेचे होते. तर देशातून सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा विक्रम करणार्‍या प्रीतमताई मुंडे दोनवेळा खासदार बनूनही त्यांचा विचार झाला नाही. तरीही मुंडेप्रेमी गप्पच होते.

राज्यात, देशातही भाजपची सत्ता असाताना एकमेव वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई झाली. तेव्हा मुंडे प्रेमींच्या सहनशीलतेचा अंत झाला. ताई काय म्हणतील? पक्षाला काय वाटेल? काय कारवाई होईल, याची तमा न बाळगता १९ कोटीसाठी तुम्ही कारवाई केली का? आम्ही सारे मुंडेप्रेमी लोकवर्गणी करून तुमच्या तोंडावर ते 19 कोटी फेकून मारू म्हणत मुंडे प्रेमी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्वीटरच्या माध्यामातून चेकवर काही लाखांचे आकडे टाकून सही करत आहेत. वैद्यनाथ कारखान्यावर कारवाई करणारांच्या तोंडावर 19 कोटी फेकू मारू असे म्हणत आहेत. या सार्‍या प्रकारामुळे छोटे- मोठे मतभेद, लहान- सहान नाराजी विसरू न मुंडेप्रेमी पुन्हा एकत्रीत होऊ लागले आहेत.

Vaidyanath Sugar Factory ताईंनी आदेश द्यावा, मी १९ कोटी देतो

वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाई ही केवळ सूडबुध्दीने असल्याची भावना मुंडे प्रेमींमध्ये तयार झाली आहे. यामुळे मुंडे प्रेंमी कार्यकर्ते पेटून उठले आहेत. १९ कोटी तोंडावर फेकून मारू म्हणत अनेकांनी सोशल मीडियावर हजार रूपयांपासून १० लाखांपर्यंतचे चेक सहीसह पोस्ट केले आहेत. खरेतर ही सारी रक्कम काही कोटीपर्यंत जात असताना परळी येथील फड नावाच्या एका व्यक्तीने 'ताईने परवानगी दिली, तर मी एकटा १९ कोटी देतो', असे म्हटले आहे.

वडिलोपार्जित जमीन विकण्याची तयारी

वैद्यनाथ कारखान्यावरील कारवाई टाळण्यासाठी मुंडेप्रेमी पेटून उठले आहेत. बीड येथील कडवे मुंडेप्रेमी सर्जेराव तांदळे यांनी वडिलोपार्जीत जमिनीचा सातबार काढून ती जमीन विकून कारखान्यासाठी काही लाखांची अर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news