Assam Child Marriage News | आसाममध्ये बालविवाह प्रकरणी मोठी कारवाई; ८०० जणांना अटक | पुढारी

Assam Child Marriage News | आसाममध्ये बालविवाह प्रकरणी मोठी कारवाई; ८०० जणांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममध्ये आज (दि.०३) मोठी कारवाई करण्यात आली आहे. बालविवाह प्रकरणी राज्यभरात आत्तापर्यंत ८०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आसाम पोलिसांनी राज्यात बालविवाहाविरुद्धची मोहीम पुन्हा सुरू केली असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून दिली आहे. (Assam Child Marriage News)

गेल्या महिन्यात, पोलिसांनी आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये १७ बनावट “काझी” (मुस्लिम विवाह सोहळा करणारी व्यक्ती) ताब्यात घेतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम पोलिसांनी २ ऑक्टोबर रोजी कोक्राझार, बोंगाईगाव आणि धुबरी येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. कोक्राझारमधील गोसाईगाव, सेरफांगुरी, काचुगाव, बोगोरीबारी येथून एकूण २४ जणांना अटक करण्यात आली. बोंगईगाव येथून ३९ तर धुबरी जिल्ह्यातून १९१ जणांना अटक करण्यात आली आहे. (Assam Child Marriage Crackdown)

तत्पूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ९ सप्टेंबर रोजी घोषणा केली होती की, त्यांचे सरकार राज्यात बालविवाहाविरूद्ध आपली मोहीम पुन्हा सुरू करणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केली होती. या मोहिमेंतर्गत बालविवाह प्रकरणी पुढील १० दिवसांत आणखी २ ते ३ हजार जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती आसाम पोलिसांनी दिली आहे. (Assam Child Marriage News)

हेही वाचा:

Back to top button