बेळगाव : ६३ अग्निवीरांनी घेतली देश सेवेची शपथ; मराठा लाईट इन्फंट्रीत शानदार कार्यक्रमाचे आयोजन

अग्निवीर
अग्निवीर
Published on
Updated on

बेळगाव : परशराम पालकर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या दुसऱ्या अग्निवीर तुकडीचा शपथविधी संभारंभ आज (मंगळवार) दिनांक 3 रोजी दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात 63 अग्‍निवीरांनी देश सेवेची शपथ घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. मराठा रेजिमेंटल सेंटरमध्ये शरकत युद्ध स्मारकाच्या प्रांगणात अग्नी विरांनी 31 आठवडे पूर्ण प्रशिक्षण घेऊन 63 अग्नीवर आज शपथ घेऊन देश सेवेत दाखल झाले. प्रशिक्षणाचे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी अग्निवरांच्या कसम परेडची पाहणी केली.

अग्निवीरांनी राष्ट्रीय ध्वज, रेजिमेंटल ध्वज आणि धार्मिक पवित्र ग्रंथ यांच्या उपस्थितीत कर्तव्य, मान आणि साहस या तत्त्वावर सैन्यात सेवा बजावण्याची शपथ घेतली.

ब्रिगेडियर मुखर्जी यांनी अग्निवीरांना मार्गदर्शन करताना, त्यांना समृद्ध वारसा आणि भारतीय सैन्याच्या सर्वात जुन्या पायदळ रेजिमेंटपैकी एक म्हणून मराठा लाईट इन्फंट्रीच्या वैभवाची आठवण करून दिली. त्यांनी सैनिकांच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व यावर भर दिला. त्यांनी रेजिमेंटल सेंटरमध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर आत्मविश्वास व्यक्त केला.

परेड दरम्यान प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकाऱ्याना, गुणवंत अग्निवीरांना सन्मानित केले. नाईक यशवंत घाडगे, सर्वोत्कृष्ट अग्निवीरचे व्हिक्टोरिया क्रॉस पदक अग्निवीर वैभव पाटील यांना प्रदान करण्यात आले. शरकत वॉर मेमोरियल येथे रेजिमेंटच्या शूर अधिकारी आणि अग्निवीरांनी अभिवादन करून परेडचा समारोप झाला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news