पुढारी ऑनलाईन : जागितक बाजारातील अनिश्चततेमुळे आज भारतीय बाजारात दबाव दिसून आला. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढ- उतार राहिला. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स आज १४ अंकांच्या किरकोळ वाढीसह ६६,०२३ वर बंद झाला. तर निफ्टी १९,६७४ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी स्टॉक्समध्ये विक्रीचा मारा झाला. तर रियल्टी स्टॉक्स वाढले. (Stock Market Closing Bell)
संबंधित बातम्या
सेन्सेक्स (Sensex Today) आज ६६,०८२ वर खुला झाला होता. पण आजच्या ट्रेडिंग सत्रात तो ६५,७६४ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक, एम अँड एम, एलटी, सन फार्मा, एसबीआय, रिलायन्स हे शेअर्स घसरले. तर बजाज फायनान्सचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर ४ टक्क्यांहून अधिक वाढून ७,८६१ वर पोहोचला. बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, एशियन पेंट्स, टायटन हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. एनटीपीसी, मारुती, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक या शेअर्सनीदेखील हिरव्या चिन्हात व्यवहार केला. (Stock Market Closing Bell)
निफ्टी ५० आज १९,६०० वर राहिला. निफ्टीवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, अपोलो हॉस्पिटल, टाटा कन्झ्यूमर आणि कोल इंडिया टॉप गेनर्स राहिले. हे १ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर हिंदोल्को, एसबीआय लाईफ, इन्फोसिस, हिरो मोटर्स, डॉ. रेड्डीज हे टॉप लूजर्स ठरले. हे १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले.
कसिनो ऑपरेटर कंपनी डेल्टा कॉर्पचे शेअर (Delta Corp shares) आज २० टक्क्यांनी घसरले. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात या शेअरने १४०.३५ रुपयांपर्यंत खाली येत ५२ आठवड्यांचा निचांक गाठला. या कंपनीला सरकारी प्राधिकरणांकडून १६,८२२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची जीएसटी कर नोटीस मिळाल्यानंतर डेल्टा कॉर्पचे शेअर्स गडगडल्याचे दिसून आले. त्यानंतर कंपनीचे शेअर्स १७ टक्क्यांच्या घसरणीसह १४४ रुपयांवर आले. मागील सत्रात डेल्टा कॉर्पच्या शेअरची किंमत १७५.४० रुपयांच्या पातळीवर होती. या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २५९.९५ रुपये एवढा आहे. तर निचांक १४० रुपये आहे. आज हा शेअर ५२ आठवड्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला. (Stock Market Closing Bell)
अनामिका शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर्स २३५.५ कोटी रुपयांना १०० टक्के संपादन करण्यासाठी करार केल्यानंतर BSE वर सोमवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये श्री रेणुका शुगर्सचे शेअर्स (Shree Renuka Sugars shares) सुमारे ५ टक्क्यांनी वाढून ५४.२ रुपयांवर गेले. दरम्यान, कंपनीला प्राधान्य शेअर्सच्या पूर्ततेसाठी ११० कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करावी लागेल.
मध्यवर्ती बँकांनी गेल्या आठवड्यात उच्च व्याजदर दीर्घकाळ राहील असे संकेत दिल्यानंतर सोमवारी आशियाई शेअर्स घसरले. आशियामध्ये MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरला. हा निर्देशांक गेल्या आठवड्यात १० महिन्यांच्या निचांकी पातळीवर आला. दुसरीकडे जपानचा निक्केई (Japan's Nikkei) ०.८ टक्क्यांनी वाढला. मालमत्तेच्या चिंतेमुळे आणि सुट्टीच्या आधी सावधगिरी वाढल्यानंतर शुक्रवारी चीनी शेअर्स घसरले. ब्लू चिप्स निर्देशांक ०.५ टक्क्यांनी कमी झाला आणि हाँगकाँगचा हँग सेंग १.२ टक्क्यांनी खाली आला.
हे ही वाचा :