Dr. Kamal Ranadive : गुगलनं (Google Doodle) डूडल केलं ‘त्या’ कमल रणदिवे आहेत तरी कोण?  | पुढारी

Dr. Kamal Ranadive : गुगलनं (Google Doodle) डूडल केलं 'त्या' कमल रणदिवे आहेत तरी कोण? 

पुढारी ऑनलाईन डेस्क :

आज मराठमोळ्या Dr. Kamal Ranadive यांना त्यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त गुगलने डूडल साकारुन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. (Dr. Kamal Ranadive’s 104th Birthday) जाणून घेवुया डॉ. कमल रणदिवे यांच्याबद्दल…

Dr Kamal Ranadive's Google Doodle

१०४ व्या जयंतीनिमित्त गुगल डूडल

डॉ. कमल रणदिवे (Dr. Kamal Ranadive) यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव गुगलने डूडल करून केला आहे. कमल रणदिवे या बायोमेडिकल संशोधक होत्या. विशेषत: कर्करोगाशी संबधित आजारावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी केलेले कार्य पाहून १९८२ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले होते. १९६० साली त्यांनी भारतातील पहिली टिश्यू कल्चर संशोधन प्रयोगशाळा मुंबईतील इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये सुरु केली.

कमल यांचा जन्म पुण्यात ८ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांचे वडील दिनकर समर्थ पुण्याच्या फर्ग्यूसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कमल यांचे  प्रारंभिक शिक्षण पुण्यातील गर्ल्स स्कूल, हुजूरपागा येथे पूर्ण झाले. कमला प्राणिशास्त्र (Zoology) विषयातून १९३४ साली चांगल्या गुणांनी पास झाल्या.

Dr. Kamal Ranadive

कमला यांच्या घरच्यांना वाटतं होते. त्यांच लग्न एका डॉक्टरशी व्हावे. अगदी तसेच झाले. त्यांचे लग्न गणितज्ज्ञ जयसिंह त्रिंबक रणदिवे यांच्याशी वयाच्या २२ व्या वर्षी झाले. लग्नानंतर त्यांना पती जयसिंह यांचा शिक्षणासाठी खूप पाठिंबा मिळाला. त्यांनी पुण्यातील अॅग्रीकल्चर कॉलेज मधून १९४३ Msc शिक्षण पूर्ण केले.

डॉ. वसंत खानोलकर यांच्याशी ओळख

Msc शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या पतीसह मुंबईला वास्तव्यास गेल्या. मुंबईत त्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल जवळ राहत होत्या. तिथे कमल आणि जयसिंह यांची ओळख पॅथॉलॉजिस्ट डॉ. वसंत रामजी खानोलकर यांच्याशी झाली आणि त्यांच्या शिक्षणाला एक दिशा मिळाली. डॉ. वसंत रामजी खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९४९ साली पीएचडी पूर्ण केली.

(Dr. Kamal Ranadive) रिसर्च फेलोशिप

पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांना रिसर्च फेलोशिप मिळाली. आणि त्या डॉ. खानोलकर यांच्या सल्ल्यानुसार जॉन हापकिन्स विद्यापीठात (अमेरिका) टिश्यू कल्चरवर रिसर्च करण्यास गेल्या.

Dr. Kamal Ranadive

ICRC ची स्थापना

रिसर्च पूर्ण झाल्यानंतर कमला (Dr. Kamal Ranadive) भारतात आल्या. Indian Cancer Research Centre-ICRC येथे सिनियर प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यांनी भारतातील पहिली टिश्यू कल्चर प्रयोगशाळा सुरू केली.

२०० पेक्षा अधिक संशाेधन लेख

कमला यांनी १९६६ ते १९७० या काळात ICRC च्या डायरेक्टर पद सांभळले. या काळात त्यांनी तब्बल २०० पेक्षा अधिक कॅन्सर आणि लॅप्रोसीवर संशाेधन लेख लिहिले. यापैकी त्यांनी स्तनाच्या कॅन्सरवर अधिक संशोधन केले.

IWSA ची स्थापना

महिलांच विज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठी त्यांनी १९७२ साली ICRC मधील ११ महिला सहकार्यांना घेऊन  Indian Women Scientists’ Association (IWSA) स्थापना केली. आज IWSA च्या ११ शाखा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून महिलांचा विज्ञान क्षेत्रातील सहभाग वाढावा यासाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

सत्य निकेतन

आदिवासी महिला व मुलांचे आरोग्य हे ध्येय ठेवून कमला यांनी  १९८९ साली सत्य निकेतन या संस्थेची स्थापना केली. त्यांना १९६४ साली मेडीकल कॉन्सिल ऑफ इंडिया कडून सिल्वर जुबली रिसर्च पुरस्कार मिळाला. १९८२ साली त्यांना भारत सरकारकडून पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. ११ एप्रिल २००१ रोजी कमला यांचे निधन झाले.

डॉ. कमल रणदिवे यांना त्यांच्या १०४ व्या जयंतीनिमीत्त गुगलने केलेले डूडल (Google Doodle) भारतीय वंशाचे कलाकार Ibrahim Rayintakath यांनी केले आहे. या गुगल डूडलमध्ये डॉ. रणदिवे मायक्रोस्कोपमध्ये पाहत आहेत.

हेही पाहा: गावात लाईट आली आणि साजरा झाला खरा दीपोत्सव

Back to top button