राष्ट्रपती भवन येथे आयोजित पद्म पुरस्कार २०२० सोहळा पार पडत आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात उपस्थित आहेत. या सोहळ्यात गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर गायक अदनान सामीलादेखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
७ पद्म विभूषण, १० पद्म भूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्काराचे वितरण केले जात आहेत. पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये २९ महिला, १६ मरणोत्तर आणि १ ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर गायक अदनान सामीलादेखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रीडा जगतातील हॉकी खेळाडू राणी रामपालला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर बॅडमिंटन खेळाडू पी. व्हि. सिंधुला पद्म भूषणने सन्मानित करण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांची पत्नी संगीता जेटली यांच्याकडे रामनाथ कोविंद यांनी पुरस्कार सोपवला.