चंद्रपूर : पट्टेदार वाघ विहिरीत पडला; वन विभागाकडून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्‍न | पुढारी

चंद्रपूर : पट्टेदार वाघ विहिरीत पडला; वन विभागाकडून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्‍न

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर जिल्‍ह्यातील वरोरा तालुक्‍यातील मोखाडा येथील शेतशिवारात पट्टेदार वाघ विहिरीत पडला. या वाघाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्‍न करण्यात येत आहेत. रात्रीच्या सुमारास हा वाघ विहिरीत पडला. त्‍याला दुपारपर्यंत विहिरीतून बाहेर काढण्यात आले नव्हते. मात्र लवकरच त्‍याला बाहेर काढण्यात येईल असा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात मोखाडा येथील शेतशिवारातील विहिरीत पट्टेदार वाघ पडल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. सकाळी शेतमालक शेतात गेला असता, विहिरीत वाघाचे गुरगुरने आणि डरकाळ्या फोडण्याचा आवाज आला. त्याने विहीरीत बघितले असता वाघ विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. लागलीच त्याने वन विभागाला माहिती दिली.

यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफा तात्‍काळ घटनास्थळी दाखल झाला. वाघाला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

दरम्‍यान, वाघ विहिरीत पडल्‍याची वार्ता समजताच गावातील नागरिकांनी विहिरीवर गर्दी केली.

Back to top button