Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यावर २८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Weather Forecast: कोकण, घाटमाथ्यावर २८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुढील २४ तासात पश्चिम राजस्थानातील काही भागात मान्सून परतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दरम्यान, राज्यातील कोकणसह, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात आजपासून (दि.२४ सप्टेंबर) पुढील ४ दिवस मुसळधारेची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या संदर्भातील माहिती हवामान विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या बुलेटीनमध्ये दिली आहे. (Weather Forecast)

संबंधित बातम्या:

हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढील २४ तासात पश्चिम राजस्थानातील भागात दक्षिण मान्सून परतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील चार दिवस महाराष्ट्रासह, बिहार, हिमालयीन भाग, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, दक्षिण गुजरात या राज्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रासह झारखंड, छत्तीसगढ, विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्र चक्रीय वादळी स्थिती निर्माण झाल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. (Weather Forecast)

Weather Forecast: 'या' जिल्ह्यांना पुढील ४ दिवस 'यलो अलर्ट'

२४ सप्टेंबर – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगांव, नाशिक,अहमदनगर,पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती आणि भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्हांना आज यलो अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार पावसाची शक्यता आहे.

२५ सप्टेंबर – ठाणे,रायगड, जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीबीड, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

२६ सप्टेंबर – जळगांव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड,धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

२७ सप्टेंबर – रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव.

२८ सप्टेंबर – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news