आज 'राजनीती' नाही, 'रागनीती' आहे : आदित्‍य ठाकरेंची परिनीती-राघव विवाह सोहळ्याला हजेरी | पुढारी

आज 'राजनीती' नाही, 'रागनीती' आहे : आदित्‍य ठाकरेंची परिनीती-राघव विवाह सोहळ्याला हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आप नेते राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आज राजस्‍थानमधील उदयपूरमध्ये कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. लग्नात सहभागी होण्यासाठी अनेक पाहुणे उदयपूरमध्ये पोहोचले होते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्‍य ठाकरेही उदयपूरमध्‍ये दाखल झाले आहेत. ( Parineeti-Raghav wedding )

उदयपूर विमानतळावर माध्‍यमांशी बोलताना आदित्‍य ठाकरे म्‍हणाले की, आज आप नेते राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा विवाह बंधनात अडकणार आहेत. याचा मला खून आनंद होत आहे. आजचा दिवस राजनीतीचा नाही तर रागनीतचा आहे. दरम्‍यान, राघव आणि परिणीती यांच्‍या विवाहासाठी शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उदयपूरला पोहोचले. त्‍याचबरोबर ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह, अभिनेत्री भाग्यश्री, टेनिसपटू सानिया मिर्झा, प्रख्‍यात ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा, माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, त्‍याची पत्‍नी आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्‍यासह अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी विवाहासाठी उदयपूरमध्‍ये दाखल झाले आहेत.  ( Parineeti-Raghav wedding )

हेही वाचा :

 

Back to top button