'अपघात रोखण्यात त्रुटी': एअर इंडियाचे उड्डाण सुरक्षा प्रमुख निलंबित | पुढारी

'अपघात रोखण्यात त्रुटी': एअर इंडियाचे उड्डाण सुरक्षा प्रमुख निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एअर इंडियाच्या उड्डाण सुरक्षा प्रमुखांना (फ्लाइट सेफ्टी चीफ) निलंबित करण्‍यात आले आहे. अपघात रोखण्‍यासाठी कारवाईतील त्रुटीप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ही कारवाई केली आहे.

‘डीजीसीए’ने आपल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, “२५ आणि २६ जुलै २०२३ राजी एअर इंडियाचे अंतर्गत लेखापरीक्षण, अपघात प्रतिबंधक उपाय आणि आवश्यक तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता याची तपासणी केली. यामध्‍ये स्‍पष्‍ट झाले की, नियामक आवश्यकतांनुसार केल्या गेल्या नाहीत. तसेच विमान अपघात रोखण्‍यासाठी आवश्‍यक उपाययोजनांमध्‍ये त्रुटी आढळल्‍या.

अपघात रोखण्‍यासाठी कारवाईतील त्रुटीप्रकरणी एअर इंडियाच्या उड्डाण सुरक्षा प्रमुखांना (फ्लाइट सेफ्टी चीफ) एक महिन्‍यासाठी निलंबित करण्‍यात आले आहे, असेही डीजीसीएने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button