

पुढारी ऑनलाईन डेस्क : थ्री इडियट्स चित्रपटात लायब्रेरियन दुबेची भूमिका साकारलेले अभिनेते अखिल मिश्रा यांचा अपघातात मृत्यू झाला. अखिल यांनी अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
अखिल मिश्रा यांनी आमिर खान, आर माधवन आणि बोमण इराणी यांच्यासोबत थ्री-इडियट्समध्ये काम केलं होतं.
रिपोर्टनुसार, हैदराबादमध्ये शूटिंग करत असताना एका इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मित्र आणि ॲक्टिंग कोच कुलविंदर बख्शी यांनी अखिल यांच्या मृत्यूची पुष्टी केली.
अखिल मिश्रा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अखिलने अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांनी भंवर, उतरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी यासारखे शोज केले होते. त्यांनी डॉन अब्बा, हजारों ख्वाहिशें ऐसी, 3 इडियट्स मध्ये काम केलं होतं. त्यांनी 3 इडियट्समध्ये लायब्रेरियन दुबेचे पात्र साकारले होते. उतरन मालिकेत त्यांनी उमेद सिंह बुदेलाची भूमिका साकारली होती.