लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली कॅनडातील गँगस्‍टरच्‍या हत्‍येची जबाबदारी, म्‍हणाले, “जे वाचले त्‍यांनाही…” | पुढारी

लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली कॅनडातील गँगस्‍टरच्‍या हत्‍येची जबाबदारी, म्‍हणाले, "जे वाचले त्‍यांनाही..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्‍या हत्‍येची घटना ताजी असतानाच कॅनडातून आणखी एका खलिस्तान समर्थक (Khalistan Supporter)  गँगस्‍टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्‍खा दुनुके याची  हत्‍या झाली आहे. या हत्‍येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. फेसबुकवर पोस्ट शेअर करून हत्‍येची जबाबदारी घेतली असून, पोस्टच्या शेवटी लिहिले आहे की वाचले आहेत त्यांना सोडले जाणार नाही.

 मॅनिटोबा प्रांतातील विनिपेग येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी सुखदूल सिंग ऊर्फ सुक्‍खा दुनुके याची हत्या केली. ताे कॅनडातील खलिस्तान चळवळीचा मोठा समर्थक होता. ताे  २०१७ मध्ये बोगस कागदपत्रांच्‍या आधारे पंजाबमधून कॅनडामध्‍ये फरार झाला होता. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरप्रमाणे सुखाचाही गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली आहे. निज्जर याची कॅनडातील सरे येथे १५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. टोळीयुद्धातून हा प्रकार घडल्‍याचे मानले जात आहे. मात्र, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कोणताही पुरावा न देता त्यांच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

सुखदूल सिंग याच्‍या पंजाबमधील नातेवाईकांना त्‍याच्‍या मृत्यूची माहिती दिली आहे. आम्ही माहिती घेत आहोत. आमच्या रेकॉर्डनुसार त्याच्यावर १५ ते १६ गुन्‍हे दाखल आहेत, अशी माहिती पंजाब पोलिसांच्‍या सूत्रांनी दिली.

कोण होता सुखदूल सिंग?

सुखदूल सिंग ऊर्फ सुक्‍खा दुनुके हा मोस्ट वॉण्टेड गँगस्टर होता. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बुधवारी जारी केलेल्या वॉन्टेड यादीत त्‍याचे नाव होते. ताे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये देविंदर बंबीहा टोळीसाठी खंडणी गोळा करत असे. खलिस्तान समर्थक असणारा सुखदूल याच्‍यावर सुपारी घेवून हत्‍या करण्‍याचाही आरोप आहे.

हेही वाचा :

Back to top button