Indian Medical Graduates : गुड न्यूज! भारतातील वैद्यकीय पदवीधारकांना विदेशातही करता येणार प्रॅक्टिस | पुढारी

Indian Medical Graduates : गुड न्यूज! भारतातील वैद्यकीय पदवीधारकांना विदेशातही करता येणार प्रॅक्टिस

पुढारी ऑनलाईन डेस्क : वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन (WFME) च्या नवीन नियमानुसार, भारतीय वैद्यकीय पदवीधरकांना आता विदेशात वैद्यकीय प्रॅक्टिस आणि पुढील शिक्षण घेता येणार आहे. भारताच्या नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) याविषयी माहिती दिली आहे. या अंतर्गत भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांना पुढील १० वर्षांसाठी WFME मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (Indian Medical Graduates)

वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशनच्या (WFME) नवीन नियमानुसार, भारतातील वैद्यकीय पदवी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना इथून पुढे यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह देशांमध्ये प्रॅक्टिस करता येणार आहे. तसेच भारतातील वैद्यकीय पदवीधारक, पदव्युत्तर शिक्षणासाठी या देशात पुढील शिक्षणासाठी जाऊ शकतात, असेही नॅशनल मेडिकल कमिशनने दिलेल्या माहितीत सांगितले आहे. (Indian Medical Graduates)

नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ला जागतिक फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशनचा (WFME) दर्जा मिळाला आहे. पुढील १० वर्षांच्या कालावधीसाठी भारताच्या नॅशनल मेडिकल कमिशनला हा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय पदवीधर आता परदेशात त्यांची वैद्यकीय प्रॅक्टिस करू शकतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषणा केली आहे. (Indian Medical Graduates)

भारतातील सर्व ७०६ विद्यमान वैद्यकीय महाविद्यालयांना WFME मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच पुढील 10 वर्षांत स्थापन होणाऱ्या कोणत्याही नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना देखील आपोआप WFME मान्यता प्राप्त होणार आहे. त्यामुळे भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

Indian Medical Graduates: जागतिक वैद्यकीय शिक्षण महासंघ (WFME)

वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन (WFME) ही एक जागतिक संस्था आहे. जी जगभरातील वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी समर्पित आहे. ही वैद्यकीय संस्था, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करतात तसेच त्यांचे समर्थन करतात. यासाठी WFME चा मान्यता कार्यक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC)

नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ही वैद्यकीय शिक्षण आणि सरावावर देखरेख करणारी भारतातील प्रमुख नियामक संस्था आहे. आरोग्यसेवा शिक्षणातील सर्वोच्च मानके राखण्यासाठी वचनबद्ध, NMC संपूर्ण देशात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी काम करते.

हेही वाचा:

Back to top button