मोठी घोषणा! आयफोन निर्माता कंपनी Foxconn भारतात करणार बंपर भरती

 iPhone maker - foxconn
iPhone maker - foxconn
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : ॲपल (Apple) ची सर्वात मोठी पुरवठादार असलेल्या फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीने भारतात त्यांची कर्मचारी संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या भारतातील प्रतिनिधीने त्याच्या लिंक्डइन अकाऊंटवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. फॉक्सकॉनचे भारतातील प्रतिनिधी व्ही ली यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७३व्या वाढदिनी शुभेच्छा देताना ही घोषणा केली.

संबंधित बातम्या 

तैवान येथील आयफोन निर्माता कंपनी फॉक्सकॉनच्या तामिळनाडू येथील प्लांटमध्ये आधीपासूनच ४० हजार कर्मचारी काम करत आहेत. आता ली यांनी कर्मचारी संख्या दुपटीने वाढविण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी नेमकी किती कर्मचारी भरती करणार याचा निश्चित आकडा सांगितलेला नाही.

फॉक्सकॉन ही सध्या जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक कंपनी आहे. या कंपनीसाठी भारत ही एक वेगाने वाढणारी आणि मोठी बाजारपेठ आहे. यामुळे त्यांनी भारतातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये उत्पादन सुविधांचा झपाट्याने विस्तार केला आहे. फॉक्सकॉन चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी बिघडलेले भू-राजकीय वातावरण कारण आहे. आता ते भारतात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करत आहेत.

व्ही ली यांनी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, आदरणीय पंतप्रधान. तुमच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात फॉक्सकॉनचा भारतात सुरळीत आणि वेगाने विस्तार झाला आहे. पुढील वर्षी तुम्हाला वाढदिवशी मोठी भेट देण्यासाठी दुपटीने रोजगार निर्मिती , एफडीआय आणि भारतातील व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आम्ही आणखी कठोर परिश्रम करू."

गेल्या वर्षीच्या अखेरीस रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, फॉक्सकॉनने पुढील दोन वर्षांमध्ये आणखी ५३ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याची आणि भारतात सुमारे ७० हजार पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची योजना आखली आहे. भारत सरकारच्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले होते.

ऑगस्टमध्ये कर्नाटकने घोषणा केली होती की Foxconn राज्यातील दोन प्रकल्पांमध्ये ६०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे. हे प्रकल्प आयफोनसाठी केसिंग कंपोनंट्स आणि चिप उत्पादनासाठी उपकरणे तयार करणार आहेत.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news