PM Vishwakarma : पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचं लोकार्पण | पुढारी

PM Vishwakarma : पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचं लोकार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरातील १८ पारंपारिक व्यावसायिकांना ‘पीएम विश्वकर्मा (PM Vishwakarma) योजनेचा लाभ दिला जाणार आहे. स्थानिक कुशल कारागीरांना अर्थ पुरवठा या योजनेच्या माध्यामातून होणार आहे. विश्वकर्मा योजनेमुळे भारतीय उत्पादनांना बाजारपेठ मिळेल. पारंपारिक व्यवसाय आता जागतिक स्तरावर पोहचतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. भारत मंडपम आणि यशोभूमी भारताच्या श्रेष्ठत्व आणि भव्यतेचे प्रतिक बनतील, असाही विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, बलुतेदारांना आधूनिक जगात नेण्यासाठी ही योजना असून ग्रामीण भागातील पारंपारिक व्यवसायांना अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारकडून १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विश्वकर्मा योजनेत १८ वेगवगळ्या कारागीरांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गंत प्रशिक्षण काळात प्रत्येक कारागीराला ५०० रूपयांचा भत्ता सरकारकडून दिला जाणार आहे. योजनेतून सरकार टूलकीट देणार असून यासाठी १५०० हजार रूपये मिळणार आहेत. वस्तूंच्या पॅकेजिंग आणि मार्केटींगसाठी सरकार प्रयत्न करेल. पारंपारिक कारागीरांनी आपली सर्व अवजारे भारतीय बनावटीची वापरावीत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवाय ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देईल. व्याजदरही खूपच कमी असतील. पहिल्या ट्प्यात १ लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळेल. त्याची परतफेड केल्यानंतर आणखी २ लाखांचे कर्ज मिळणार आहे. वंचितांचा विकास हेच आमच्या सरकाचं लक्ष्य आहे. आपल्या देशात बनवलेल्या वस्तूंना सरकार जागतिक बाजारपेठ मिळवून देईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

जगात कॉन्फरन्स टुरिझम वाढत आहे, आहेत. जगातील कॉन्फरन्स टुरिझम उद्योग २५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दरवर्षी ३२ हजार पेक्षा जास्त मोठी प्रदर्शने आणि एक्सपोज जगात आयोजित केले जातात. २ ते ५ कोटी लोकसंख्या असलेले देशही ही व्यवस्था करतात, आपली लोकसंख्या १४० कोटी आहे. कॉन्फरन्स टुरिझमसाठी येणारे लोक सामान्य पर्यटकांपेक्षा जास्त पैसे खर्च करतात. या उद्योगात भारताचा सहभाग फक्त १ टक्के आहे. आजचा नवा भारत कॉन्फरन्स टुरिझमसाठी स्वतःला तयार करत आहे. भारत मंडपम आणि यशोभूमी दिल्लीला संमेलन पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र बनवेल. भारत मंडपम आणि यशोभूमी भारताच्या श्रेष्ठत्व आणि भव्यतेचे प्रतिक बनतील, असा विश्वास यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

Back to top button