PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात ११ कलमी कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा | पुढारी

PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात ११ कलमी कार्यक्रम; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या विकासासाठी ११ कलमी कार्यक्रमाची घोषणा आज (दि. १७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यामध्ये शेतकरी, असंघटीत कामगार, महिलांसाठी विविध योजना राबवणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संबंधित बातम्या : 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी कालची बैठक घेतली. ४५ हजार कोटी रूपयांच्या योजना आणि पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी निधी दिला आहे. यामुळे मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा संपेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ कलमी कार्यक्रमाला काल कॅबिनेटमध्ये मान्यता घेतली आहे. राज्यात पंतप्रधानांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त ११ कलमी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. देशासह राज्यालाही ‘जी २०’ मुळे मोठा फायदा झाला. देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. ‘जी २०’ मुळे राज्यातील व्यापाराला चालना मिळाली. मोदींच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास सुरू आहे. राज्य वेगाने विकास करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

११ कलमी कार्यक्रमामध्ये नमो महिला सशक्तिकरण अभियान, नमो कामगार कल्याण योजना, नमो शेततळी अभियान यासह गावा-गावांमध्ये रस्त्यांच जाळं उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील ७३ गावं आत्मनिर्भर करण्यात येतील. नमो कामगार कल्याण योजनेअंतर्गत ७३ हजार बांधकाम कामगारांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या मुलांचे शिक्षण, शिष्यवृत्ती आणि अन्य योजना देणार आहे. असंघटीत कामगारांना शाश्वत योजना मिळाल्या पाहिजेत यासाठी सरकार काम करत आहे. त्याचबरोबर राज्यात ७३ हजार शेततळी उभारणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button