Alphabet layoffs | Google ची पॅरेंट कंपनी ‘अल्फाबेट’मध्ये नोकरकपात, शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ

Alphabet layoffs | Google ची पॅरेंट कंपनी ‘अल्फाबेट’मध्ये नोकरकपात, शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ

पुढारी ऑनलाईन : गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने (Alphabet layoffs) त्यांच्या जागतिक स्तरावरील टीममध्ये नोकरकपात केली आहे. या टेक दिग्गज कंपनीने नियुक्त्याही कमी करणे सुरू ठेवले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अल्फाबेटने त्यांच्या जागतिक स्तरावरील एचआर टीममधून शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. शंभरभर कर्मचार्‍यांना कमी करण्याचा कंपनीचा निर्णय हा व्यापक स्तरावरील नोकरकपातीचा भाग नाही आणि महत्त्वांच्या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीमध्येच आणि इतरत्र नोकरी शोधण्यातदेखील मदत होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

२०२३ च्या सुरुवातीला मेटा (Meta), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आणि अॅमेझॉन (Amazon) सारख्या दिग्गज कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केल्यानंतर अल्फाबेट ही या तिमाहीत कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी पहिली मोठी टेक कंपनी आहे. कॅलिफोर्निया स्थित अल्फाबेटने जानेवारीमध्ये सुमारे १२ हजार नोकर्‍या कमी केल्या होत्या. हे प्रमाण त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ६ टक्के होते. (Alphabet layoffs)

एम्प्लॉयमेंट फर्म चॅलेंजर ग्रे अँड ख्रिसमसच्या अहवालानुसार, अमेरिकेतील नोकरकपात ही जुलैपासून ऑगस्टपर्यंत तिप्पट आणि एका वर्षापूर्वीच्या तुलनेत जवळपास चौप्पटीने वाढली आहे.

रॉयटर्सने घेतलेल्या पोलमध्ये अर्थशास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की ९ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचे लाभ मिळवण्याचे नवीन दावे सुमारे ८ टक्क्यांनी वाढतील.

AltIndex च्या आकडेवारीनुसार, टेक कंपन्यांनी २०२३ मध्ये सुमारे २.२६ लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news