पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारे SPG प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे निधन | पुढारी

पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारे SPG प्रमुख अरुण कुमार सिन्हा यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) चे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे आज (दि.६) हरियाणातील गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. 2016 पासून एसपीजी प्रमुख म्हणून काम करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ते सांभाळत होते. त्यांना नुकतीच सेवेत मुदतवाढ देण्यात आली होती.

अरुण कुमार सिन्हा यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून यकृताशी संबंधित आजारावर उपचार सुरू होते. सिन्हा हे 1987 च्या बॅचचे केरळ केडरचे आयपीएस अधिकारी होते. एसपीजी प्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी सिन्हा केरळमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. या वर्षी ३० मे रोजी SPG प्रमुख म्हणून सिन्हा यांच्या निवृत्तीच्या एक दिवस आधी, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) त्यांना आणखी एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता.

हेही वाचा : 

Back to top button