‘G-20’ मध्ये शुद्ध शाकाहारी मेन्यू, बायडेन, सुनाक स्ट्रीट फूडवर ताव मारणार | पुढारी

‘G-20’ मध्ये शुद्ध शाकाहारी मेन्यू, बायडेन, सुनाक स्ट्रीट फूडवर ताव मारणार

दिल्ली G-20 शिखर परिषदेच्या (G20 Summit) यजमानपदासाठी सज्ज झाली आहे. 9 ते 10 सप्टेंबर रोजी ‘भारत मंडपम’ या ठिकाणी विदेशी पाहुण्यांसाठी पोषक आहार तयार केला जाणार आहे. आहार पूर्णपणे शाकाहारी असणार आहे. स्वीट डिशेससह मिरचीच्या तडक्याचा आस्वाद घेता येणार आहे.

120 आचार्‍यांची नियुक्ती

विदेशी पाहुण्यांसाठी नाष्टा (ब्रेकफास्ट), लंच (दुपारचे भोजन) आणि डिनर (रात्रीची मेजवानी) तयार करण्यासाठी 120 आचारी अर्थात शेफ यांची नियक्ती करण्यात आली आहे. पाहुण्यांसाठी खास 500 डिशेस बनविण्यात येणार आहेत.

वेस्टर्न थाळींचीही सुविधा

भारतीय डिशेससोबत पाश्चात्त्य आहारही बनविला जाणार आहे. यामध्ये फ्यूजन आणि मिनी बाईट्सचा समावेश असणार आहे. थायलंड आणि डेनमार्कचे मेन्यूही तयार केले जाणार आहेत.

स्वीटमध्ये काय असणार

स्वीट डिशेसमध्ये मलाई घेवर, पिस्ता, कुल्फी, श्रीखंड, केसर पिस्ता, ठंडाई, खीर, गाजर हालवा, रसमलाई, अंजीर हलवा, फालुदा या पदार्थांचा समावेश आहे.

नाश्त्यासाठी विशेष

पराठा, इंडली-सांभार, डोसा, उत्तापा या साऊथ इंडियन डिशेसची चवही पाहुणे चाखतील. पाणीपुरी, दहीपुरी, सेवपुरी, जोधपुरी मिरची वडा, दाल-पराठा, जोधपुरी पुलाव, छोले की टिक्की.

गहू, तांदळाचा वापर नाही

गहू आणि तांदळापासून बनविल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांचा समावेश केला जाणार नाही. बाजरीसह धान्यांपासून तयार केलेल्या मिश्रणांपासून रुचकर आणि स्वादिष्ट डिशेस बनविल्या जाणार आहेत.

भेंडी, मेथीच्या भाज्यांची चव चाखणार

भेंडी, पनीर, डाळी, आलू मटार, दम दाल मखनी, मेथी या भाज्यांचा आहारात समावेश असणार आहे.

मक्का-बाजरीच्या रोट्या

रोटी, पराठा, नान यावर पाहुण्यांना ताव मारता येणार आहे. मक्का आणि बाजरीच्या रोट्यांचा मेन्यूत समावेश आहे.

बायडेन, सुनाक स्ट्रीट फूडवर ताव मारणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आदींसह अन्य देशांचेही प्रमुखही स्ट्रीट फूडचा आस्वाद घेणार आहेत. चाट, गोल गप्पे, दही भल्ले, भल्ले-पापडी, आलू टिक्की, जलेबी, कचौरी आदी भारतीय खाद्यपदार्थांची चव पाहुणे चाखतील.

Back to top button