पुढारी ऑनलाईन डेस्क : द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांच्याविरुद्ध 'सनातन' धर्माबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी मंगळवारी (दि.६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टॅलिन यांच्यावर सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या आवाहनासाठी आणि खर्गे यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर कृत्य आणि विविध धार्मिक गटांमधील तेढ वाढवणे या प्रकरणी कलम 153A, 295A IPC अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. स्टॅलिन यांच्या वक्तव्याने भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्टॅलिन यांनी शनिवारी तामिळनाडूतील एका कार्यक्रमात सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. त्यांच्या टिप्पण्यांमुळे राजकीय पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजपने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
हेही वाचा :