Rakshabandhan 2023 : रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा | पुढारी

Rakshabandhan 2023 : रक्षाबंधनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाचा उत्सव बहिण-भावाच्या अतुट प्रेमाचे प्रतीक आहे तसेच अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. या शुभ दिनी आपण देशातील महिलांसाठी अधिक सुरक्षित तसेच समानतापूर्ण वातावरण बनवण्याचा संकल्प करू, असा संदेश राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरून दिला.(Rakshabandhan 2023)

पंतप्रधानांनी देखील देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.प्रत्येकाच्या जीवनातील स्नेहभाव आणि सौहार्दाची भावना या सणाच्या निमित्ताने वृध्दिंगत होवो, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. “माझ्या परिवारातील सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्यातील विश्वास आणि अगाध प्रेमाला समर्पित असलेला रक्षाबंधनाचा हा मंगलमय सण आपल्या संस्कृतीचे पवित्र प्रतिबिंब आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात स्नेह, सद्भाव और सौहार्दाच्या भावनेला वृद्धिंगत करो’ अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

दरम्यान पंतप्रधानांनी शाळकरी मुलांसोबत रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पंतप्रधांना राखी बांधत आशिर्वाद घेतला. पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थिनींसोबत संवाद देखील साधला.

हेही वाचा 

Back to top button