Raksha Bandhan Special Narali Bhat Recipe : आज बनवा नारळी भात, महाराष्ट्राच्या परंपरेतील खास पदार्थ | पुढारी

Raksha Bandhan Special Narali Bhat Recipe : आज बनवा नारळी भात, महाराष्ट्राच्या परंपरेतील खास पदार्थ

महाराष्ट्रात नारळी पोर्णिमेला मोकळ्या भाताला नारळ, गुळ आणि अनेक मसाल्यांमध्ये शिजवून नारळ भात बनवला जातो. (Narali Bhat Recipe) महाराष्ट्राच्या परंपरांगत खास पदार्थ म्हणजे नारली भात. ही रेसिपी बनवायची कशी बनवायची? रक्षाबंधनच्या औचित्यानेही नारळी भात बनवून घरच्या मंडळींनाही खूश करा. (Narali Bhat Recipe)

नारळी पोर्णिमच्या सणाला खास करून हा पदार्थ कोकणात बनवला जातो. सर्व मसाले, गुळ आणि तांदुळ, नारळ सर्व पदार्थ पौष्टिक असून आरोग्यास फायदेशीर आहे. झटपट रेसिपी कसी बनवायची हे पाहून घ्या.

No Image

Recipe By स्वालिया शिकलगार

Course: लंच Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपे

Servings

५ minutes

Preparing Time

२० minutes

Cooking Time

३५ minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. बासमती तांदुळ

  2. ओला नारळ

  3. गुळ

  4. मणुके

  5. वेलदोडे

  6. लवंग

  7. तूप

  8. बादाम

  9. काजू

  10. दालचिनी

DIRECTION

  1. तांदुळ स्वच्छ धुवून घ्या

  2. अर्ध्या तासासाठी पाणी घालून भिजवायला ठेवा

  3. नंतर पाण्यातून तांदुळ काढून घ्या

  4. भात शिजवण्यासाठी तुम्ही मायक्रोवेवचा देखील वापर करू शकता

  5. गॅसवर आता एका भातात २ चमचे तूप घाला

  6. गॅस मंद आचेवर ठेवा

  7. त्यामध्ये प्रमाणानुसार दालचिनी, लवंग टाका

  8. त्यात भिजवलेले तांदूळ टाका

  9. दोन कप पाणी ओतून मिक्स करून घ्या

  10. मंद आचेवर भात हलके शिजवून घ्या

  11. काजू, बदामचे ड्राय फ्रूट कट पातळ काप करून घ्या

  12. मणुकेतील बिया काढून घ्या

  13. वेलदोडेची पावडर बनवून घ्या

  14. शिजवलेला भात काढून घ्या

  15. एका पॅनमध्ये तूप घाला, त्यात सुका मेवा टाकून हलके तळून घ्या

  16. ओल्या नारळाचा खिस टाका आणि गुळ (खिसलेला) टाकून मिक्स करून घ्या

  17. जोपर्यंत गुळ विरघळत नाही ते पर्यंत भात परतून घ्या

  18. २० मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या

  19. झाकण उडून वेलदोडे पावडर टाकून घ्या

  20. गुळाऐवजी तुम्ही साखरही टाकू शकता

  21. आता एका प्लेटमध्ये भात घालून त्यावर सुकामेवा टाकून सजवून घ्या

  22. गरमागरम नारळी भात खायला घ्या

NOTES

  1. नारळ भातासाठी तांदुळ थोडे कमी शिजवून घ्यावे लागतात.

Back to top button