Imran Khan | इम्रान खान यांचा कोठडीतील मुक्काम वाढला; १३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | पुढारी

Imran Khan | इम्रान खान यांचा कोठडीतील मुक्काम वाढला; १३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

पुढारी ऑनलाईन: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तोशाखान प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते. त्यानंतर काल (दि.२९ ऑगस्ट) त्यांना इस्लामाबाद न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यांची सुटका होताच, काही तासांत सायफर प्रकरणात इम्रान यांना पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणी आज (दि.३० ऑगस्ट) त्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आता १३ सप्टेंबरपर्यंत वाढला आहे. त्यामुळे ते पुढचे काही दिवस तुरुंगातच राहणार (Imran Khan) आहेत, असे वृत्त पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दिले आहे.

इम्रान खान यांना पाकिस्‍तानमधील गुप्तता कायद्यांतर्गत सायफर प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सत्तेत असताना राजकीय हेतूने गोपनीय डिप्लोमॅटिक केबलचा (सायफर) गैरवापर केल्याचा आरोप (Imran Khan) त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे.

Imran Khan: तोशाखान प्रकरणी शिक्षेला स्थगिती

तोशाखान भ्रष्‍टाचार प्रकरणी लाहोर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्‍या पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान व तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना मोठा दिलासा दिला. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने काल (दि.२९) यांच्या शिक्षेला स्थगिती दिली,

तोशाखाना प्रकरणी झाली होती तीन वर्षांची शिक्षा, एक लाखांचा दंड

तोशाखाना प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी इम्रान खान यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला त्‍यांनी उच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते. सोमवारी न्‍यायालयाने निकाल राखून ठेवला होता. शिक्षेच्या स्थगितीची कारणे नंतर जारी करण्यात येणाऱ्या सविस्तर निकालात देऊ, असे उच्‍च न्यायालयाने म्हटले होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने काल (दि.२९) यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच त्‍यांची जामिनावर सुटका करण्‍याचे आदेशही दिले आहेत.

निवडणूक लढविण्‍याचा मार्ग मोकळा?

न्यायालयाने शिक्षेबाबत दिलेल्या निकालाने इम्रान खान यांचे राजकीय भवितव्य अंधारात टाकले होते. दोषी ठरल्यानंतर इम्रान खान यांना आगामी निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले. पण, आता उच्च न्यायालयाने इम्रान खानच्या शिक्षेला स्थगिती देऊन त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिल्यामुळे इम्रान खान निवडणूक लढवतील, असा विश्‍वास त्‍यांचे समर्थक व्‍यक्‍त करत आहेत.

हेही वाचा:

Back to top button