C Voter Survey | पीएम मोदींचे वारसदार कोण? ‘या’ नेत्याला सर्वाधिक पसंती, सर्वेक्षण काय सांगते? | पुढारी

C Voter Survey | पीएम मोदींचे वारसदार कोण? 'या' नेत्याला सर्वाधिक पसंती, सर्वेक्षण काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा उमेदवारी घेतली नाही तर त्यांचा वारसदार कोण असणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. इंडिया टुडे-सी व्होटर मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वात योग्य असल्याचे म्हटले आहे. (C Voter Survey)

इंडिया टुडे-सी व्होटर मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सर्वात योग्य आहेत. सर्वेक्षणानुसार, २९% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, अमित शहा हे पंतप्रधान मोदींच्या नंतर सर्वात योग्य आहेत, त्यानंतर त्यांच्याजागी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विचार होऊ शकतो.

C Voter Survey : पीएम मोदींनी भारताचे नेतृत्व करावे

पंतप्रधान मोदींनी भारताचे नेतृत्व करावे असे ५२ टक्के लोकांना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अबाधित आहे, कारण ५२ टक्के उत्तरदात्यांचे म्हणणे आहे की ते या सर्वोच्च पदासाठी योग्य आहेत. लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम राहिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ४४ टक्के लोकांनी सांगितले की ते पीएम मोदींमुळे भाजपला मतदान देतील, तर २२ टक्के लोक म्हणाले की ते विकासामुळे पक्षाला मतदान करतील आणि १४ टक्के मतदान हिंदुत्वामुळे भाजपच्या बाजूने मतदान करतील.

हेही वाचा 

Back to top button